आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये हस्तक्षेप नाहीच; बीफ बंदीवर मोदी सरकारची स्पष्टोक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये हस्तक्षेप करण्याचा पीएम नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा हेतू मुळीच नाही अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी केली आहे. सरकार बीफ बिझनेसमध्ये सुद्धा दखल देऊ इच्छित नाही. मोदी सरकारने नुकतेच दुभत्या जनारांच्या कत्तलीसाठी केल्या जाणाऱ्या खरेदी आणि विक्रीवर बंदी लावली. यासंदर्भात अध्यादेश सुद्धा काढला आहे. या कायद्याचा विविध पक्षांकडून विरोध होत असताना मंगळवारी केंद्रीय आरोग्यम मंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 
 
काय म्हणाले हर्षवर्धन?
- कत्तलखान्यांवर तयार केलेले विधेयक तो सुप्रीम कोर्टाच्या पूर्व निर्देशानुसारच तयार करण्यात आले आहे. यानंतर एक महिना विचार करण्यासाठी देण्यात आला. त्यानंतरही सल्ला मागवण्यासाठी सुद्धा वेळ दिला आहे. 
- सरकारकडे काही लोकांचे सल्ले आले आहेत. त्यांना विधेयकात समाविष्ट केले जाणार आहे. सरकारने तयार केलेले नियम लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलण्यासाठी मुळीच नाहीत. यामुळे, बीफ व्यवसाय खराब व्हावा अशीही मोदी सरकारची इच्छा नाही. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.