आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Said Corner Muslims And Destroy The Demons

संघाचे मंचावरुन मुस्लिमांना धमकी, मोदींचे मंत्री म्हणाले- ताकद दाखवावी लागले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी आग्रा येथे विहिंप कार्यकर्ता अरुण माथूरच्या शोकसभेत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामशंकर कठेरिया. - Divya Marathi
रविवारी आग्रा येथे विहिंप कार्यकर्ता अरुण माथूरच्या शोकसभेत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामशंकर कठेरिया.
आग्रा - केंद्रीय राज्यमंत्री रामशंकर कठेरिया यांनी अल्पसंख्याक समुदाबाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने ते चर्चेत आले आहे. कठेरियांनी रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) एका कार्यकर्त्याच्या श्रद्धांजली सभेत म्हटले, 'आपल्यालाही ताकद दाखवावी लागले. युद्ध पुकारावे लागेल. असे केले नाही तर उद्या आपल्याला आणखी सहकारीही गमवावे लागती.' व्हीएचपी कार्यकर्ता अरुण माथूरची गुरुवारी हत्या करण्यात आली होती. ती दुसऱ्या समुदायाने केल्याचा आरोप आहे.
कार्यक्रमाला भाजप खासदारही उपस्थित
- इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, गेल्या गुरुवारी व्हीएचपी कार्यकर्ता अरुण माथूरची हत्या झाली होती.
- या घटनेनंतर आग्रा आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण होते.
- अरुणच्या हत्येचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी शोकसभेचे आयोजनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
- रविवारी आयोजित शोकसभेला भाजप आणि संघाशी संबंधीत नेते आले होते.
- कठेरिया भाषणात म्हणाले, 'हे हत्यारेच येथून निघून जावे, अशी आपली ताकद असली पाहिजे.'