आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Union Minister Kiren Rijiju Gives It Back To Naqvi I Eat Beef Can Somebody Stop Me

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'होय! मी खातो गोमांस, कोण रोखणार?\', किरेन रिजिजू यांचे नक्वींना आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयजल/ नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारवर वर्षपुर्तीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे, गोमांस बंदीवरून मोदी सरकारमधील दोन मंत्री आमने-सामने आले आहे. केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यात जुंपली आहे. 'होय! मी खातो 'बीफ', कोण रोखणार मला?' असे म्हणत किरेन रिजिजू यांनी गोमांस बंदीला आव्हान दिले आहे.

काय म्हणाले रिजिजू....
'गोमांस खाणाऱ्यांनी पाकिस्तानत निघून जावे, असा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री नक्वी यांच्यावर गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी खोचक टीका केली आहे. 'मुख्तार अब्बस नक्वी यांचे वक्तव्य तथ्यहीन आहे. मी अरुणाचल प्रदेशमध्ये राहातो. गोमांस खातो. कोण रोखणार मला? असे आव्हान देत किरेन रिजिजू यांनी नक्वी यांना प्रती सवाल केला आहे.

मिझोरममध्ये राहाणारा एखादा ख्रिश्चन म्हणत असले की, ही येशूची भूमी आहे. तर त्याला पंजाब आणि हरियाणाला नाराज व्हायचे काही कारण नाही. आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र राहातात. त्यामुळे आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या भावनाचा आदर करावा, त्यांच्यावर दबाब टाकू नये. जर असे होत असेल तर ते चुकीचे अाहे.', असेही रिजिजू यांनी म्हटले आहे.

सरकारच सहमत नाही!
दरम्यान, नक्वींच्या वक्तव्याशी सरकार सहमत नसल्याचे याआधीच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते. नक्वी यांचे हे वैयक्तिक मत असल्याचेही जेटलींनी स्पष्ट केले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय म्हणाले होते मुख्तार अब्बास नक्वी...