आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर पर्रिकरांचे ममतांना पत्र- तुमच्या आरोपांनी लष्काराचे मनोधैर्य खच्चीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ममतांच्या आरोपाने दुःख झाले असल्याचे पर्रिकरांनी पत्रात म्हटले आहे. - Divya Marathi
ममतांच्या आरोपाने दुःख झाले असल्याचे पर्रिकरांनी पत्रात म्हटले आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये लष्कराच्या उपस्थितीने वाद निर्माण झाला होता. या वादानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. पर्रिकरांनी लिहिले, 'लष्कराला वादात ओढल्याने आणि आपण केलेल्या आरोपांमुळे दुःख वाटते. यामुळे संरक्षण यंत्रणेच्या मनोधौर्याचे खच्चीकरण होते.' दरम्यान, तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओ ब्रायन यांनी आरोप केला, 'पत्र मुख्यमंत्र्यांना मिळण्याआधी मीडियामध्ये लीक झाले आहे.' पश्चि बंगालमध्ये सत्ता पालट करण्याचे षडयंत्र होते, त्यासाठी लष्कर तैनात करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला होता.
तृणमूल नेते म्हणाले- पत्राला कडक उत्तर दिले जाईल
- डेरेक ओ ब्रायन म्हणाले, पत्र मिळाल्यानंतर आम्ही त्याचे कडक उत्तर देऊ.
- पर्रिकरांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना 8 डिसेंबर रोजी पत्र लिहिले, ते शुक्रवारी माध्यमांमध्ये आले आहे.
पर्रिकर ममतांना म्हणाले- आपल्या संस्थांकडेच चौकशी केली असती...
- पर्रिकरांनी पत्रात म्हटले आहे, आर्मीच्या ईस्टर्न कमांडने बंगालशिवाय इतरराज्यांमध्ये 1 आणि 2 डिसेंबर रोजी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील टोल नाक्यांवरील हेवी व्हेकल्सचे हालचालींची माहिती गोळा केली होती.
- माहिती गोळा करण्याची ही एक्सरसाइज आर्मी अनेक वर्षांपासून राज्य सरकारांच्या एजन्सींच्या सल्ल्याने काही मुदतीत करत आली आहे.
- आपण (ममता बॅनर्जी) केलेल्या आरोपांमुळे दुःख होत आहे.
- जर तुम्ही या कामात जोडल्या गेलेल्या संस्थांकडे चौकशी केली असती तर लष्कर आणि राज्य सरकारी संस्थांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती मिळाली असती.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...