आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Nirmala Sitharaman\'s Baggage Lost In Australia In Air India Flight

निर्मला सीतारामण यांची सुटकेस सापडली, साडीबाबत व्यक्त केली होती चिंता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- केंद्रीय वाणिज्‍य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामण यांची सुटकेस सापडली आहे. ऑस्‍ट्रेलियात आयोजित 'जी-20' देशाच्या वाणिज्य मंत्र्याच्या बैठकीला सीतारामण या गेल्या आहेत. परंतु प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या विमानात सीतारामण यांची कपड्यांची सुटकेस गहाळ झाली होती. त्यामुळे बैठकीला कुठली साडी नेसावी, अशी चिंता सीतारमण यांनी व्यक्त केली होती.

केंद्रीय मंत्री सीतारामण यांनी शुक्रवारी 'टि्वट' करून एअर इंडियाच्या विमानात त्यांची सुटकेस गहाळ झाल्याची माहिती दिली. सीताराणम या साडी परिधान करतात. केर्न्समध्ये कुठे साडी मिळणार? असा प्रश्न सीतारामण यांच्या पुढे उपस्थित झाला होता.

सिडनेहून केर्न्ससाठी विमान बदलताना सीतारामण यांची सुटकेस गहाळ झाल्याची घटना घडली. दरम्यान, एअर इंडियाने काही तासांतच केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम यांची गहाळ झालेली सुटकेस शोधून काढली आहे.

सीतारमणने व्यक्त केली होती साडीची चिंता...
सीतारामण केर्न्ससाठी निघाल्यानंतरही त्यांची कपड्यांची सुटकेस सापडलेली नव्हती. केर्न्समध्ये पोहोचल्यानंतर साड्या कुठे मिळतील? बैठकीला कुठली साडी नेसावी? असे प्रश्न सीतारामण यांच्या पुढे उभे राहिले होता. परंतु काही तासांतच एअर इंडियाने सीतारामण यांची सुटकेस शोधून काढली. एअर इंडियाच्या विमानात हिंदी गाण्यांचा उत्कृष्ठ संग्रह असल्याचे
(फाइल फोटो: वाणिज्‍य व उद्योग मंत्री निर्मला सीतारमण)