आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त काही महिने थांबा पाकला वठणीवर आणू : गृह राज्यमंत्री हंसराज अहिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत सात दशके पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सहन करत आहे. आता मात्र सहनशीलतेचा अंत झाला आहे. पाकिस्तान सुधारेल म्हणून आपण ७० वर्षे वाट पाहिली. आता केवळ काही महिने प्रतीक्षा करा, पाकिस्तानला वठणीवर आणण्याचा संकल्प सरकारने केला आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये दिली.
दीड महिन्यापूर्वी गृह राज्यमंत्री म्हणून पदाची सूत्रे घेतलेल्या अहिर यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशातील सर्व केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर, केंद्र व राज्यांचे संबंध, अंतर्गत सुरक्षा, नक्षलवाद आदी जबाबदाऱ्या साेपविल्या आहेत. त्यांच्याशी ही बातचीत.

*भारत मैत्रीची भाषा करतो आणि पाकचे दहशतवादी हल्ले सुरूच आहेत, त्याला प्रत्युत्तर कसे देणार?
- भारत सहनशील देश आहे. नरेंद्र माेदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला तेव्हा सार्क देशाच्या सर्व प्रमुखांना बाेलावले हाेते. शेजारच्या सर्व राष्ट्रांशी मैत्री अधिक घट्ट व्हावी हा त्यामागचा हेेतू हाेता. पण पाकिस्तान नेहमी वाकड्यात शिरताे. सीमेजवळ अशांतता पसरविणे, दहशतवादी हल्ले घडवून आणणे हे कृत्य पाकिस्तान करत आहे. जशास तसे उत्तर देणे हा धर्म आहे. तो आता आम्ही पाळणारच.

* पाकव्याप्त काश्मीरबाबत तुमची भूमिका काय आहे?
- पाकिस्तानबाबत केंद्र सरकार आता कठाेर झाले आहे. काश्मीरचा विषय ही आमची अंतर्गत बाब आहे. पाकिस्तानने त्यात ताेंड खुपसायचे कारण नाही. पाकव्याप्त काश्मीर हा भाग कायद्यानुसार भारताचा आहे. त्यामुळे यापुढे चर्चा हाेईल ती या भागावरच. हा भाग भारताचे अविभाज्य अंग करण्याची तयारी आम्ही करीत आहाेत.

* पाकवर हल्ला करणार?
- पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायचे आहे. फक्त त्यासाठी काही महिने थांबावे लागेल. मात्र, पाकिस्तानला सरळ वागण्याची अजूनही संधी आहे.

* भारतावर युनोचे दडपण येणार नाही का?
- पाकिस्तानचा खरा चेहरा काय आहे, हे युनोसह जगाने आेळखले आहे. त्यामुळे युनाे आम्हाला प्रत्येकवेळी थांबवू शकणार नाही. आम्हाला आमचा देश सुरक्षित करायचा आहे.

* पाकवर कारवाईसाठी देशांतर्गत काही अडथळे आहेत का?
- अजिबात नाही! १२ आॅगस्टला पंतप्रधानांनी काश्मीरप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बाेलाविली हाेती. काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, असेच सर्व पक्षांचे मत आहे. पाकिस्तानला धडा शिकवा हा सगळ्यांचा सूर हाेता. सर्वांचे सहकार्य असल्याने केंद्र सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे.

* पाकशी चर्चा हाेऊ शकते?
- शक्यता कमी आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील समस्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तरीसुद्धा तो भारताविराेधात कुरापती करताे. बलुचिस्तानातील मानवाधिकाराच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यावे.

* नक्षलवाद थांबवण्यासाठी काही उपाययाेजना?
- मी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील असल्याने जनमानसावर त्याचे विपरीत परिणाम कसे हाेतात याची मला जाणीव आहे. नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी माझ्या काही कल्पना आहेत. यासंदर्भात याेजना आखली जात आहे. त्यांना लवकरच मूर्त रूप दिले जाईल.

* देशांतर्गत सुरक्षेसाठी काय करणार आहात?
- देशांतर्गत अनेक समस्या आहे. जात-धर्म यापलीकडे जाऊन लाेकांच्या समस्या साेडवायच्या आहेत. समता आणि अखंडता कशी राहील यासाठी मी काम करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...