आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरू-पटेल-नेताजींना म्हणे दिले फासावर, जावडेकरांची वि‘स्मृती’, वक्तव्यावरून प्रचंड वादंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या तोंडी आलेल्या एका वक्तव्यावरून मंगळवारी वादंग माजले. ऐतिहासिक दाखले देताना त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्रजांनी फासावर लटकावले असा आशय असल्याचा एक व्हिडिओ पण व्हायरल झाला.

मध्य प्रदेशात छिंदवाडामधील एका जाहीर सभेचा हा व्हिडिओ आहे. जावडेकर यात म्हणतात, ‘स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला आणि ९० वर्षांपूर्वी १८५७ मध्ये थांबला. या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू, भगतसिंग, राजगुरू या सर्वांना ज्यांना इंग्रजांनी फासावर लटकावले त्यांना आपण वंदन केले पाहिजे,’ असे हे वक्तव्य होते. जावडेकर यांनी टि्वटरवर खुलासा केला. गांधी, नेहरू, बोस यांची नावे घेतल्यावर मी थांबलो. पुढील वाक्यात मी शहिदांची नावे घेतली, असे ते म्हणतात.
बातम्या आणखी आहेत...