आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्बन वायू उत्सर्जन थांबवण्याचे संस्कार भारतीय जीवनशैलीतच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशांचा अाैद्याेगिक िवकास हाेत असतानाच अाकाशात कार्बन स्पेसचे अतिक्रमण झाले अाहे. प्रत्येक देशातील एकतृतीयांश जागा कार्बनने व्यापली अाहे. ‘क्लायमेट चेंज’च्या िनमित्ताने सगळे िवकसनशील देश एकत्र येऊ संयुक्त लढा देत असले तरी त्या- त्या देशांना व्यापलेली कार्बन स्पेस त्यांना रिकामी करावी लागेल. भारताने त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली अाहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी "दिव्य मराठी'ला िदलेली विशेष मुलाखत.
हवामान बदलावर पॅरिसमध्ये नाेव्हेंबरच्या शेवटी ते िडसेंबरच्या दुसऱ्या अाठवड्यापर्यंत हाेत असलेल्या अांतरराष्ट्रीय परिषदेत प्रत्येक देश हवामान बदलावर केलेली कृती अाणि उपाययाेजना याबाबतचा अाढावा सादर करणार अाहे. जाे जन्मास अाला त्याला िवकासाचा सारखाच अधिकार अाहे हे भारताचे सूत्र असणार अाहे. खऱ्या अर्थाने भारत या परिषदेचे नेतृत्व करू शकेल इतकी तयारी अाम्ही केली अाहे. जगात भारत हा एकमेव देश असा अाहे की, वेगाने हाेणारे हवामानातील बदल थांबविण्याचे संस्कार येथील जीवनशैली व लाेकांमध्ये अाहेत. अन्य िवकसनशील देशांमध्ये उधळपट्टी अाणि वस्तू टाकूण देणे यामुळे त्या देशांनी कार्बनडाय अाॅक्साईडशी दाेस्ती केली अाहे. त्यामुळे जलवायू परिवर्तन हाेत अाहे. अाैद्याेगिक िवकास करणे अाणि वाढणारे तापमान यामुळे जगातील बहुतांश देशांत सारखेच प्रश्न अाहेत. काेळसा अाणि ऊर्जेच्या अाधारावर उद्याेग सुरू झालेत तेव्हा हा बदल झालेला अाहे. ते सोडवण्यासाठी अाता सामूहिक लढा देण्याची गरज अाहे.

गेल्या दाेनशे वर्षांत जागतिक ०.८ डिग्री तापमान वाढले अाहे. अाता सर्व िवकसीत देशांनी एकत्र येऊन तापमान दाेन िडग्रीपेक्षा अधिक वाढू नये यावर िवचारविनिमय केला ताेच हवामान बदलाचा मूळ गाभा अाहे. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा, स्वच्छ परिसर या िदशेने सगळेच देश काम करायला लागले अाहेत. ज्या देशांचे कार्बन उत्सर्जन अधिक अाहे अशा जवळपास ४० देशांनी एकत्रित भूमिका घेऊन काम करायचे ठरविले अाहे. युराेप, अमेरिका, जपान, भारत अादींचा त्यात समावेश अाहे, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. देशातील गरिबांना समृद्ध करणे हा भागसुद्धा हवामान बदलासाठी महत्त्वाचा ठरणार अाहे. अाज ३० टक्के लाेकांकडे वीज नाही. त्यांच्याकडे गॅस नाही, काेळसा अाणि लाकडे जाळली जातात यातून हाेणारे प्रदूषण थांबविण्यासाठी सरकारने गरीबी हटविणे ही धडक माेहिम हाती घेतली अाहे.
देशात ३५ कोटी टन कार्बन वायू तयार होणे थांबेल : भारताने १ लाख ७५ हजार मेगा वॅट हरित ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले अाहे. त्यात १ लाख मेगावॅट सौरऊर्जा, ६० हजार मेगावॅट पवन ऊर्जा, १० हजार मेगावॅट जैविक ऊर्जा मिळवायची अाहे. सात वर्षांमध्ये हे लक्ष्य गाठायचे अाहे. गेल्या वर्षभरात याला गती िमळाली असून िनविदाही काढण्यात अालेल्या अाहेत. लाेकच या प्रकल्पामध्ये सहभागी हाेत अाहेत, असे जावडेकर म्हणाले.

साैर उर्जा सुरु झाली तेव्हा १८ रुपये प्रती युनिट हाेते अाता केवळ सहा रुपयांवर अाहे. तरीसुद्धा वीज तीन रुपयांत तयार हाेते. याला अाज दुप्पट पैसे माेजावे लागत असले तरी हरित कृतीसाठी अाम्ही क्लायमेट चेंजच्या िनमित्ताने अाम्ही हे अाव्हान स्वीकारले अाहे. या कृतीमुळे प्रत्येक वर्षी ३५ काेटी टन कार्बनडाय अाॅक्साईड वायूची हाेणारी निर्मिती थांबणार अाहे.
सर्वच नद्यांचे दहा वर्षांत शुद्धीकरण करणार
स्वातंत्र्यांच्या ७० वर्षानंतरही ७० टक्के मल हे नदीत साेडल्या जाते, कारखान्यांचे पाणी नदी प्रवाहात िमसळल्या जात असल्याने देशातील सर्वच नद्या प्रदूषित अाहेत. पुण्यातील मुळा-मुठेमाणेच अन्य महत्वाच्या नद्या पुृढच्या दहा वर्षात शुद्ध करण्याचा अाम्ही संकल्प केला अाहे. त्यासाठी अपारंपारिक उर्जा निर्माण करणे, पाण्याची बचत करणे, काेळशापासून वीज निमिर्तीला कसा फाटा देता येईल याचा िवचार करणे, ‘िक्लन इंिडया, ग्रीन इंिडया’ हे अभियान याचसाठी अाहे. ई कचरा, प्लास्टिक कचरा, बायाेमेडिकल वेस्ट अादी सगळ्यांचेच नवीन िनयम केले अाहेत. दाेन महिन्यात ते लागू हाेतील, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.
भारतीय जीवनशैलीच आदर्श ठरेल
नरेंद्र माेदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या िवषयाकडे िवशेष लक्ष िदले. िवदेशात अर्ध अन्न टाकूण देणे, कपडे जुने झाले की फेकून देणे, पुस्तकांचा वापर झाल्यास ती रद्दीत टाकणे याबाबी सातत्याने हाेत असतात. भारतात मात्र टाकून देण्याची वृत्ती नसल्याने कचरा अाणि रद्दीचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत कमी अाहे. अमेरिकेत रात्री दुकाने बंद झाली तरी लाईट सुरुच असतात, त्यांच्याकडे पैसा अाहे म्हणून ते असे वागतात परंतु मानवतेसाठी असे करणे हा गुन्हा अाहे. अन्य देशांना भारतीय जीवनशैली अात्मसात करावी, असे आवाहन
त्यांनी केले.
त्यासाठी अाम्ही तयारी करीत अाहाेत. याेगसुद्धा क्लायमेट चेंजशी जाेडल्या जाईल.
प्रदूषणाची पातळी वाढू देणार नाही
देशात सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या २००० उद्याेगांची नाेंद करण्यात अाली अाहे. त्यातील एक हजार उद्याेगांना सूचनेनुसार मॉनिटर बसविले. अन्य उद्याेगात येत्या चार महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण हाेणार अाहे. आगामी देशातील प्रदूषणाची पातळी खूप कमी करता अाली. नाही तरी ती जराही वाढणार नाही, याची खात्री पर्यावरण मंत्री
म्हणून मी देताे, असे जावडेकर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...