आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Union Minister RaviShankar Prasad Inspects Post Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: अचानक पोस्ट ऑफिसमध्ये आले मंत्री, अस्वच्छतेवरून अधिका-यांना झापले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : नवी दिल्लीच्या गोल डाकखाना येथे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद.

नवी दिल्ली - केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सोमवारी दिल्लीच्या गोल डाकखानाची अचानक पाहणी केली. केंद्र सरकारचे 'स्वच्छता अभियान' सगळीकडे राबवले जात आहे. तरीही याठिकाणी असलेली अस्वच्छता पाहून मंत्री महोदयांनी कार्यालयातील वरीष्ठांन धारेवर धरले. प्रसात यांनी पोस्ट कार्यालयातील वेगवेगळ्या कोप-यातील कपाटाची स्वतः पाहणी केली. स्वतः सर्व अस्वच्छपणा लोकांना दाखवून दिला.
अस्वच्छता पाहताच प्रसाद भडकले होते. त्वरित त्यांनी सगळ्या अधिका-यांना बोलावून घेत, स्वच्छतेचे काम कोण पाहतो, याची विचारणा केली. पंतप्रधानांच्या निर्देशांनंतरही एवढी दूर्दशा कशी अशी विचारणाही त्यांनी केली. वरीष्ठ अधिका-यांनी त्यांना या प्रकरणी सॉरी म्हटले. पण त्यानंतर मंत्री आणखीच भडकले. सॉरी काय असते. वारसा स्थळांपैकी एक असूनही इमारतीची अशी अवस्था कशी असू शकते? अशा शब्दांत त्यांनी अधिका-यांना सुनावले.


ग्राहकांची विचारपूस
मंत्री महोदयांनी यावेळी पोस्ट कार्यालयात उपस्थित असणा-या सामान्य नागरिकांबरोबरही चर्चा केली. त्यांना काही अडचण आहे का? याची विचारणा केली. निरीक्षणानंतर मीडियाशी चर्चा करताना रवीशंकर प्रसाद म्हणाले की, अशा प्रकारे वेळोवेळी आढावा घेतल्यास मंत्री आणि सरकारची भूमिका याबाबत कडक असल्याचे सर्वांच्या लक्षात येईळ. त्यामुळे सगळ्यांनीच कामाला लागायला हवे, हा संदेश लोकांपर्यंत जाईल, असे प्रसाद म्हणाले आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, प्रसाद यांच्या दौ-याचा VIDEO