आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Salman Khurshid Calls Narendra Modi 'impotent' News In Marathi

मोदींसाठी नपुंसकपेक्षा दुसरा चांगला शब्द नाही : खुर्शीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरात दंगलीसंदर्भात नरेंद्र मोदी यांना नपुंसक संबोधणारे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. ते बुधवारी म्हणाले की, त्यांच्यासाठी (मोदी) यापेक्षा दुसरा चांगला शब्द नाही. खुर्शीद यांनी फरुखाबादमध्ये मंगळवारी वादग्रस्त विधान केले होते. यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांनी पुन्हा हल्ला चढवत म्हटले, मी डॉक्टर नाही. मी त्यांची शारीरिक तपासणी करू शकत नाही. नपुंसकतेबाबत बोलायचे झाले तर त्याचा राजकीय अर्थ असा की, एखादी व्यक्ती कोणतेही काम करण्यास सक्षम नाही.

भाजपने याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले, आम्ही असे शब्द वापरल्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध करतो. खुर्शीद विदेशात शिकले आहेत. त्यांना देशाच्या संस्कृतीचा विसर झाल्याचे दिसते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल कॉँग्रेसने माफी मागावी.

पहिल्यांदा असे म्हटले होते
काही जण आले, हल्ला केला आणि चालले गेले. हे घडताना तुम्ही सुरक्षा देऊ शकला नाहीत. आम्ही तुमच्यावर खुनाचा आरोप ठेवत नाही. तुम्ही नपुंसक आहात हा आमचा आरोप आहे. तुम्ही खुन्यांना आवर घातला नाही, असे खुर्शीद यांनी मंगळवारी म्हटले होते.