आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी तीन गार्ड्‍सला झोडपले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या सुरक्षा रक्षकाने गाजियाबादमधील एका हाऊसिंग सोसायटीच्या तीन गार्ड्सला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही घटना कैद झाली आहे. विशेष म्हणजेे, न्यूज एजन्सीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नंतर मंत्री महोदयांना पीडित गार्ड्‍सची माफीही मागितली.

काय आहे हे प्रकरण?
- महेश शर्मा हे मोदी सरकारमध्ये सांस्कृतिक व पर्यटन मंत्री आहेत.
- गुरुवारी ते गाजियाबाद येथील आशियाना ग्रीन अपार्टमेंट्समध्ये राहाणार्‍या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी सोसायटीच्या तीन गार्ड्‍सला बेदम मारहाण केली.
- फ्लॅट नंबर विचारण्यासाठी गार्ड्‍सनी मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या गेटवर काही मिनिटांसाठी थांबवल्‍या होत्या.
- पीडित गार्ड्‍स म्हणाला की, गेट उघडण्यासाठी 2 मिनिटांपेक्षा कमी कालावधी लागला होता. तितक्यात मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनी शिविगाळ करत बेदम मारहाण केली.

शर्मा यांचे सुरक्षा रक्षक सस्पेंड...
- महेश शर्मा यांनी सांगितले की, सुरक्षा रक्षकांंना ‍‍तडकाफडकी सस्पेेंंड करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
- पीडित गार्ड्सची शर्मा यांनी माफी मागितली आहे.

निळ्या दिव्यातील गाडीत होते सुरक्षा रक्षक...
-महेश शर्मा यांचे सुरक्षा रक्षक निळ्या दिव्यातील गाडीत बसले होते. गाडीवर पोलिस असेल लिहिले होते.
- या प्रकरणी इंदिरापुरम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनेेचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...