आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Union Ministers Wife Registered Fir Against A Man For Threatening And Blackmailing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंगांच्या पत्नीला मागितली २ कोटी खंडणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘छेडछाड’ केलेल्या व्हिडिओ क्लिपद्वारे तुमच्या पतीची बदनामी करीन असे ब्लॅकमेलिंग करून केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या पत्नी भारती सिंग यांना प्रदीप चौहान या व्यक्तीने दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

गुरगावचा रहिवासी प्रदीपने दोन कोटी रुपये दिले नाही तर गंभीर परिणाम होतील, असे धमकावल्याचे भारती यांनी तुघलक रोड पोलिसांतील तक्रारीत म्हटले आहे. तपास सुरू आहे. आरोपीची चौकशी केली आहे. त्याला लवकरच दुसऱ्यांदा बोलावू. त्याला अद्याप अटक केली नाही,असे पोलिसांनी सांगितले.प्रदीप खतरनाक माणूस आहे. त्याच्यासोबत बंदूक असते. त्यामुळे आपल्या सुरक्षेला गंभीर धोका आहे,असे भारतींचे म्हणणे आहे. प्रदीपविरुद्ध भादंविच्या कलम ३८४ व ५०६ नुसार एफआयआर नोंदवण्यात आला.

‘ताे’ माझ्या पुतण्याचा मित्र
प्रदीप माझ्या पुतण्याचा मित्र आहे म्हणून माझी ओळख आहे. काही दिवसांपासून तो व्हिडिओ क्लिप जाहीर करून तुमच्या पतीची प्रतिष्ठा धुळीस मिळवीन, असे फोनवर धमकावत आहे. - भारती सिंग, मंत्र्यांच्या पत्नी
बातम्या आणखी आहेत...