आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्रिमंडळात होणार बदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रातील सत्ताधारी यूपीए आघाडी सरकारचा द्रमुकने पाठिंबा काढून घेतल्यानंतर रिक्त झालेली पदे भरण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रिमंडळात किरकोळ फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान डर्बनहून परतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी याबाबत चर्चा करतील. त्यानंतरच फेरबदलाची तारीख निश्चित होईल.

द्रमुकचा एक कॅबिनेट, तर चार राज्यमंत्री होते. या फेरबदलात सध्या राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) असलेल्या श्रीकांत जेना यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यमंत्र्यांच्या पदावर एक-दोन नवीन चेहºयांनाही संधी मिळू शकते. काही मंत्र्यांच्या खात्यातही खांदेपालट होण्याची शक्यता आहे. यात नेमक्या कोणत्या मंत्र्यांचा समावेश आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. लोकसभेत द्रमुकचे 18 खासदार होते.