आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंना केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेताना काय \'आठवले\', वाचा रंजक किस्से

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपाध्यक्ष अमित शहांनी अचानक दिल्लीला बोलावून घेतले. तिथे गेल्यानंतर कळाले की उद्या आपला शपथविधी आहे त्यामुळे उत्तर प्रदेशच्या कार्यकर्त्याने दिलेली निळी पगडी घातली. खरे तर आठवलेंना कोल्होपूरी फेटा हवा होता - Divya Marathi
भाजपाध्यक्ष अमित शहांनी अचानक दिल्लीला बोलावून घेतले. तिथे गेल्यानंतर कळाले की उद्या आपला शपथविधी आहे त्यामुळे उत्तर प्रदेशच्या कार्यकर्त्याने दिलेली निळी पगडी घातली. खरे तर आठवलेंना कोल्होपूरी फेटा हवा होता
दिल्ली/मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला केंद्रीय मंत्रीपदाचा मान रामदास आठवले यांच्यामुळे मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेताना रामदास आठवले हे स्वतःचे नाव घेण्यास विसरले होते. त्यामुळे सर्वांच्याच ते लक्षात राहिले. मात्र, सांगलीतून मुंबईत शिक्षणासाठी आलेला तरुण नंतर आंबेडकरी समाजाच्या एका मोठ्या समुदायाचा नेता झाला. 5 जुलै रोजी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेताना त्यांच्या मनात काय आले असेल ?

शपथ घेताना रामदास यांना काय 'आठवले'
रामदास आठवले यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी पँथरचा 1972 पासूनचा काळच सर्वांसमोर उभा केला. 'क' ला 'क' 'ट' ला 'ट' असे यमक जुळवत चारोळ्या करत मिष्किल भाषण करणारा हा नेता गंभीर आहे. अजूनही आपला संघर्ष विसरलेला नाही. मुंबईतील सुखवस्तू वस्तीतील बंगल्यात गेल्यानंतरही त्यांच्यातील कार्यकर्ता अजून जीवंत असल्याचा प्रयत्य त्यांनी त्यावेळी दिला.

'एबीपी माझा'च्या कट्ट्यावर रामदास आठवले यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे काही प्रश्नांची मिश्किल उत्तरे दिली असली तरी या नेत्याचे राजकारण गंभीर असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मुंबई महापालिकेत किती जागांची मागणी करणार या प्रश्नाचे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. 'शिवसेना - भाजप यांच्यात सर्वकाही सुरळीत व्हावे असे मला वाटत नाही असेही नाही' म्हणत त्यांनी आपल्याला वाढीव जागा हव्यात असाच संकेत दिला आहे. त्यासोबतच मोदींना इतर मंत्री घाबरत असतील, मी त्यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे असले तरी माझी शैली सोडणार नाही. असेच एक प्रकारे सांगितले आहे. रोहित वेमुला आणि कन्हैय्या कुमार प्रकरणासाठी त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
> 'पँथर'चा काळ
> 'मोदींच्या सभांना लोक जमलेले असतात की जमवलेले'
> स्पष्ट कबुली - बाबासाहेबांच्या स्वप्नातील पक्ष बनवू शकलो नाही
> रामदास आठवले यांना काय आवडते
> मंत्रीपद मिळाले पण कार्यालय नाही
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...