पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आणि समाजसेवीका किरण बेदी भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर दिल्ली विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद
केजरीवाल यांच्यासोबत किरण बेदी यांनी बळकटी दिली होती. आता निवडणुकीच्या निमित्ताने
केजरीवाल आणि बेदी समोरासमोर येणार आहेत.
प्रोफेसर म्हणून करिअरची सुरवात करणाऱ्या किरण बेदींनी पहिल्या महिला आयपीएस होऊन शिस्तबद्धपणे कायदा आणि सुव्यवस्था राबवून दाखविला होता. यावेळी त्यांनी राजकीय दबावापुढे जराही माघार घेतली नाही. एक कठोर पोलिस अधिकारी अशी त्यांनी ख्याती होती. तिहार तुरुंगात अधिकारी असतानाही त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखविल्या.
किरण बेदी यांचे काही दुर्मिळ आणि UNSEEN फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...