आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UP CM Akhilesh Yadav Controversial Comment On UP's Law And Order Situation

'तुम्ही सुरक्षित आहात ना?', महिला सुरक्षेच्या प्रश्नावर महिला पत्रकाराला अखिलेशचा उलटप्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बदायू येथे झालेल्या सामुहिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणानंतर समाजवादी पक्षाच्या सरकारवर चौफेर टीका होत आहे. त्यातच आता अखिलेश सरकारने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. उत्तर प्रदेशात एका महिला पत्रकाराने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेच्या बाबतीच प्रश्न विचारला होता. पण त्यामुळे चिडलेल्या अखिलेश यादव यांनी उलट त्या महिला पत्रकारालाच उलटप्रश्न केला. तुम्हाला तर काही धोका झाला नाही ना? अशा शब्दांना अखिलेश यांनी राग व्यक्त केला.
अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यांतर सोशल मिडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. TWITTER वर युझर्स सीएमच्या या वक्तव्यावर टीका करताना हे लज्जास्पद वक्तव्य असल्याचे म्हणाले आहेत.
अनेक युझर्सनी त्यांचे हे वक्तव्य म्हणजेच, त्यांच्यावर असलेला वडीलांचा प्रभाव आहे, असे म्हटले आहे. त्याचे कारण म्हणजे, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान समाजावादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींचा बचाव केला होता. मुलांकडून अशा चूक होतच असताता, अशा शब्दांत मुलायम यांनी आपले मत मांडले होते.

काय म्हणाले अखिलेश व्हिडीओ पाहा अखेरच्या स्लाईडवर...