आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश यांनी चित्रपट पाहण्यापेक्षा कायदा सांभाळावा : भाजप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपच्या ‘लव्ह जिहाद’ मुद्द्याला रविवारी लक्ष्य केले. त्यासाठी हवाला घेतला मथुरेतील भाजपच्या खासदार तथा अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या चित्रपट गीतांचा. तुम्ही भाजप खासदारांची गाणी ऐकली असतील ना, किती छान आहेत. ज्या ठिकाणाहून हा मुद्दा आला, त्या भागातील लोक आपल्या खासदारांना ओळखतात. ‘धर्मात्मा’मधील त्यांचे गाणे आठवते ना. मग गाणे असेल तर प्रेम तर वाढेल की थांबेल, अशी मुक्ताफळे अखिलेश उधळली.
प्रेमावर निर्बंध लावले जाऊ शकतील का, परस्परांना भेटण्यास लोकांना विरोध करता येऊ शकेल का, असा सवालही त्यांनी केला. त्यावर भाजपने अखिलेश यांना टोमणा मारला. त्यांनी चित्रपट पाहण्या ऐवजी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची चिंता केली पाहिजे.

भाजपच्या प्रस्तावात शब्द नाही
मथुरा- लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाजपने यूटर्न घेतला आहे. वादानंतर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावातून लव्ह जिहाद शब्द वगळण्यात आला आहे. वास्तविक प्रस्तावात याचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख करण्यात आला. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.