आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP ओपिनियन पोल: अखिलेश होतील मुख्‍यमंत्री, 28% लोकांची अखिलेश यांना पसंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली -  सीएसडीएस आणि एबीपी न्‍यूज यांनी यूूपी विधानसभा निवडणूूक- 2017 निवडणूूक सर्वेक्षण केले आहे. त्‍याचे निकाल त्‍यांनी नुकतेच घोषित केले. नोटबंदी आणि समाजवादी पार्टीच्‍या अंतर्गत कलहादरम्‍यान 5 ते 17 डिसेंंबर या कालावधीमध्‍ये हे सर्वेक्षण करण्‍यात आले. उत्‍तरप्रदेशातील 65 विधानसभा मतदारसंघामधील 5000 पेक्षा जास्‍त नागरिकांचे मत यासाठी नोंदविण्‍यात आले. सर्वेक्षणानूसार, उत्‍तर प्रदेशातील 28% लोकांनी भावी मुख्‍यमंत्री म्‍हणून अखिलेश यादव यांना पसंती दिली आहे. 34% लोक अखिलेश यांच्‍या तर 32% लोक नरेंद्र मोदींंच्‍या कामावर समाधानी आहेत.
वाचा ओपिनियन पोलच्‍या खास बाबी.
 
Q- उत्‍तर प्रदेशमध्‍ये सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण?
- अखिलेश- 83%, मुलायम- 6%
 
Q- अखिलेश की मुलायम, मुख्‍यमंत्री कोणी बनावे?
- अखिलेश- 37%, मुलायम- 33%
- सपाच्‍या मतदारांमधील 83% मतदारांची अखिलेश यांना पसंती आहे.
 
Q- मुख्‍यमंत्रीपदाची पहिली पसंती कोण?
- सर्वाधिक पसंती अखिलेश यांना (28%), दुसऱ्या क्रमांकावर मायावती तर तिसरा क्रमांक महंत आदित्‍यनाथ यांना मिळाला.
 
Q- कोणाचे सरकार जास्‍त चांगले आहे?
- 45% लोकांनी म्‍हटले आहे, की अखिलेश सरकार मायावती यांच्‍या सरकारपेक्षा  चांगले आहे. 

Q- सपामधील भांडणाला जबाबदार कोण? 
- शिवपाल- 25%, अखिलेश- 6%
 
कोणत्‍या पक्षाला किती मते?
- 54% मुस्लिम मतदार सपासोबत 
- 75% यादव मतदार सपासोबत 
- 55% सवर्ण मतदार भाजपासोबत 
- 74% जाटव मतदार बसपासोबत
- 56% दलित मतदार बसपासोबत     
  
बातम्या आणखी आहेत...