आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15-20 दिवस वाट पाहाण्याची गरज नाही, आता 48 तासांत मिळणार PAN CARD

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पॅन कार्ड तयार करण्यासाठी आता 15 ते 20 दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. केवळ 48 तासांत तुमचे पॅन कार्ड तयार होईल. सरकार लवकरच अशी योजना तयार करणार आहे, ज्यामुळे ऑनलाइन पद्धतीने फक्त दोन दिवासांमध्ये तुमचे पॅनकार्ड तयार होईल. याआधी पॅनकार्ड तयार होण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागत होता.
ग्रामीण भागात पॅनकार्ड तयार करण्यासाठी शिबीर सुरु होणार
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, 'पॅन कार्ड तयार करण्यासाठी लवकरच ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे फक्त 48 तासांत कार्ड मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना पॅनकार्ड मिळवून देण्यासाठी विशेष शिबारांचे आयोजन केले जाणार आहे.' केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने (सीबीडीटी) नुकतीच एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, जन्म तारखेचा पुरावा म्हणून मतदान कार्ड आणि आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे.
कशासाठी गरज आहे पॅन कार्डची
प्राप्तीकर भरणा (आयकर रिटर्न) दाखल करण्यासाठी, एका निश्चित किंमतीपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी, वाहन खरेदी-विक्रीसाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. याशिवाय बँकांमध्ये एक निश्चित रक्कमेपेक्षा जास्त भरणा करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे असते.