आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरप्रदेशमध्ये दोन गटात हाणामारी; तीन जण ठार, जमावाची पोलिसांवरही दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत ३ जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. लहान मुलीला छेडल्यामुळे दोन्ही गटांत हाणामारी झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
लखनऊ पासून 400 किलोमिटर अंतरावर असलेल्या खूर्जा येथील सैनदा फरिदापूर या गावात सोमावारी एका 14 वर्षीय मुलीला काही तरूणांकडून छेडण्यात आले होते. त्यानंतर या हाणामारीला सुरूवात झाली.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटली असून इंद्रपाल जातव (वय 36), बलविर ठाकूर (वय 45) आणि ओमप्रकाश (वय 48) अशी त्यांची नावे आहेत.
हाणामारी थांबवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही या तरूणांनी हल्ला चढवला. यामध्ये एक महिला कॉन्स्टेबलही जखमी झाली आहे. परिस्थिती अटोक्या बाहेर जात असल्याचे लक्षात येताच तेथे सशस्त्र पोलिस दलाला पाचारण करण्यात आले आहे. गावक-यांच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास आणि महिला कॉन्स्टेबल सुमन यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे.