लखनऊ- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर एका तरुणाने बूट भिरकावल्याची घटना घडली. सुदैवाने राहुल यांना बूट लागला नाही. सीतापूर येथे सोमवारी दुपारी काढण्यात आलेल्या शेतकरी रॅलीत राहुल गांधी यांनी सहभाग घेतला होता. यादरम्यान ही घटना घडली. आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी राहुल गांधी यांनी शेतकरी रॅली काढली. राहुल गांधी उघड्या जीपमध्ये होते. शेतकर्यांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी मागून एका व्यक्तीने राहुल गांधींच्या दिशेने बूट भिरकावला.
काय म्हणाला बूट भिरकावणारा तरुण?
- काँग्रेसने 60 वर्षे देशाला लुटण्याचे काम केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.
- आरोपीने सांगितले की, तो पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. शिक्षण महागल्याने सगळ्यांचे कंबर मोडले आहे.
- शेतकर्यांना वीज माफ करा, कर्ज माफ करा, अशा अनेक मागण्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरला आहे. मोदी सरकारकडेकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. पण, काँग्रेस तब्बल 60 वर्षे सत्तेत होते. मग तेव्हा शेतकर्यांना मोफत वीज करा दिली नाही. शेतकर्यांचे कर्ज माफ का झाले नाही, असा उलट सवालही आरोपीने राहुल गांधी यांना केला आहे.
राहुल गांधी काय म्हणले?
- राहुल गांधी शेतकर्यांना संबोधित करताना म्हटले की, काँग्रेसने बिहारमध्ये नीतीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाशी आघाडी केली तेव्हा भाजपच्या विरोधात मुलायमसिंह यादव यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला नाही.
- पुढे राहुल गांधी म्हणाले की, आमची लढाई भाजप विरुद्ध आहे. देशातील गरीबीच्या विरोधात आहे.
- मोदी सांगतात की ते, इंटरनेटच्या माध्यमातून देशातील शेकर्यांशी संवाद साधत आहेत. पण, मोदी आणि शेतकर्यांमध्ये 2000 किलोमीटर अंंतर आहे. मोदी शेतकर्यांची भेट टाळतात. त्यांना शेतकर्याची गळाभेट घेण्यास भीती वाटते, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.
पुढील स्लाइडवर वाचा, घटनेेचा व्हिडिओ आणि फोटोज...