लखनौ- उत्तर प्रदेशच्या राजधानीत एका 12 वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे, तर नराधमांनी विद्यार्थिनीच्या मृतदेहावर दोन दिवस बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीएम हाऊसपासून 500 मीटर अंतरावर जंगलात विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन रिक्षाचालकांना अटक केले आहे. दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. दोन्ही नराधमांनी आधी विद्यार्थिनीचे अपहरण केले. तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करून तिची हत्या केली. इतकेच नव्हेतर तिच्या मृतदेहावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचे पोलिसांना दिलेला जबाबात सांगितले.
गुंता वाढणार? बलात्कारी दोन नव्हे सहा...विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे. अनेक प्रश्न असे आहेत, की अद्याप पोलिस त्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. आरोपींना कोर्टात हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे, विद्यार्थिनीवर बलात्कार करणारे दोन नव्हे सहा जण होते, ही माहिती मिळाली आहे. पोलिस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
काय आहे प्रकरण?- जानकीपुरममधील राहाणारी प्रगती (बदललेले नाव) इंदिरा नगरमधील आरएलबी स्कूलची विद्यार्थिनी होती.
- 10 फेब्रुवारीपासून ती बेपत्ता होती.
- 15 फेब्रुवारीला हजरतगंजमधील पार्क रोडवरील जंगलात एका नाल्याजवळ तिचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळापासून सीएम हाऊस अवघ्या 500 मिटर अंतरावर आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
पोस्टमार्टम रिपोर्ट ?
- गुप्तांगातील रक्तस्त्रावामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. गळ्यावर दोरीचे व्रण व डोक्यावरील जखमा या मृत्यूनंतरच्या आहेत.
- मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोलिसांना कोणतेही रक्ताचे डाग दिसून आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुठपर्यंत पोहोचला पोलिस तपास ?
- लखनौचे पोलिस आयुक्त राजेश कुमार पांडेय यांनी सांगितले की, दोन्ही अारोपींची कसून चौकशी सुरु आहे.
-दोन्ही नराधमांची पॉलिग्राफिक व नार्को टेस्टही होणार आहे. याशिवाय ताब्यात घेण्यात आलेले गोल्फ क्लबचे दोन्ही कर्मचार्यांची देखील नार्को टेस्ट होईल.
आरोपींनी कसा बदलला जबाब पाहा, पुढील स्लाइडवरील ग्राफिक्समधून...