आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेरगिरी करणा-या सॉफ्टवेअर कंपनीचे ‘यूपीए’ हाेते ग्राहक, विकिलिक्सचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोणतेही फोन, डेस्कटॉप कॉम्प्युटर्सची हेरगिरी करण्याची क्षमता असलेले सॉफ्टवेअर तयार करणा-या इटलीतील एका वादग्रस्त कंपनीचे देशातील यापूर्वीचे यूपीए सरकार आणि आघाडीच्या गुप्तहेर संघटना ग्राहक होत्या. विविध ई-मेल आणि माहितीच्या आधारे विकिलिक्सने हा दावा केला आहे.

२०११ मधील या ई-मेलनुसार, भारतीय वकिलातीने इटलीशी संपर्क साधून हॅकिंगची क्षमता असलेल्या या रिमोट कंट्रोल सिस्टीमचे (१६ स्पाय वेअर) दिल्लीत सादरीकरण करण्याचा प्रस्ताव कंपनीला दिला होता. काही स्थानिक वृत्तसंस्थांनुसार, ही कंपनी जे सॉफ्टवेअर तयार करते ते बेकायदा नाहीत. जगभरातील पोलिस यंत्रणा व गुप्तहेर संघटना याचा सर्रास वापर करतात. याउलट जगातील इतर माध्यमांनी मात्र ही कंपनी हेरगिरी करणारी उपकरणे विकत असल्याचे म्हटले आहे. कंपनीने हे तंत्रज्ञान रशिया, सौदी अरब आणि इतर काही देशांच्या सरकारला विकल्याचेही स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे या देशांचा हेरगिरीच्या बाबतीत असलेला इतिहास फारसा चांगला नाही.

विकिलिक्सनुसार, हॅकिंग टीममधील काही लोक भारतातही आले होते. त्यांनी तत्कालीन यूपीए सरकारमधील वरिष्ठांसमोर सादरीकरणही केले होते. यात सरकारसह आयबी व रॉ या गुप्तहेर संघटनांतील अधिकारी होते. भारताशी हा व्यवहार करण्यासाठी ही वादग्रस्त कंपनी इस्रायलमधील नाईस या कंपनीशी हातमिळवणी करत होती. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांवर देखरेखीचा प्रयत्न हाेता.संशयित ई-मेल व कॉम्प्युटर्सवर देखरेख करता यावी म्हणून हा प्रयत्न केला गेला होता.