आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPA Coordination Committee Gives Grean Signal To Telangana Formation

तेलंगणाला युपीएचा हिरवा कंदील, विदर्भाच्या मागणीला जोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- वेगळ्या तेलंगणा राज्‍यनिर्मितीला संयुक्त धर्मनिरपेक्ष आघाडीने (युपीए) हिरवा कंदील दाखविला असून आता कॉंग्रेसच्‍या कार्यसमितीच्‍या बैठकीत त्‍यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. तेलंगणाच्‍या मुद्यावरुन आज कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधींनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. त्‍यानंतर दुपारी 4.30 वाजता युपीएच्‍या समन्‍वय समितीची बैठक झाली. त्‍यात तेलंगणाच्‍या निर्मितीसाठी सहमती मिळाल्‍याची माहिती सुत्रांनी दिली. कॉंग्रेसच्‍या कार्यसमितीची बैठक झाली असून त्‍यात पुढील निर्णय होणार असल्‍याचे सुत्रांनी स्‍पष्‍ट केले.

तेलंगणा राज्‍य निर्मितीचा निर्णय झाल्‍यास आंध्र प्रदेशमध्‍ये परिस्थिती चिघळण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे आंध्र प्रदेशमध्‍ये सुरक्षा दलाच्‍या 100 तुकड्यांना पाचारण करण्‍यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी मात्र तणावग्रसत परिस्थिती नसल्‍याचे सांगितले आहे. तेलंगणाला विरोध करणा-यांनी आज (मंगळवारी) दुपारी आंध्र प्रदेशमध्‍ये विविध ठिकाणी रॅली काढून निषेध नोंदविला. हैदराबाद, कर्नूल, एलुरु, विजयवाडा इत्‍यादी ठिकाणी निदर्शने करण्‍यात आली.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर

कॉंग्रेसचे नागपूर येथील खासदार विलास मुत्तेमवार यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे. जर वेगळा तेलंगणा होऊ शकतो तर विदर्भाची मागणी का मान्य केली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, शिवसेनेने वेगळ्या विदर्भाला विरोध केला असून संयुक्त महाराष्ट्र राहावा, अशी भूमिका मांडली आहे.