आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आप\'नंतर आता दिल्ली कॉंग्रेसला धक्का, माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांचा भाजप प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि मनमोहनसिंग सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आज (सोमवारी) भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तिरथ यांना कॉंग्रेसचा 'हात' सोडून भाजपचे 'कमळ' हाती घेतल्याने दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले आहे. युपीए सरकारच्या काळात तिरथ यांच्याकडे महिला व बालविकास मंत्रिपदाचा कार्यभार होता.
मला जनतेसाठी काम करायचे आहे. भाजपमध्ये मला कोणती जबाबदारी द्यायची, याबाबतचा निर्णय अमित शहा घेतील, असे तिरथ यांनी सांगितले. दरम्यान, तिरथ यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणार उतरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तिरथ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा शहा यांच्यासोबत दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतिश उपाध्याय आणि दिल्लीचे प्रभारी प्रभात झा उपस्थित होते.
अमित शहा यांनी तिकीट वाटपात केला फेरबदल
आम आदमी पार्टीचा वाढता प्रभाव आणि भाजपमध्ये बंडखोर उमेदवारांच्या प्रवेशामुळे भाजप उमेदवार आणि कार्यकर्त्यांत असंतोषाचे वातावरण आहे. यामुळे अमित शहा यांनी तिकीट वाटपात मोठा फेरबदल केला असल्याचे समजते. सुमारे चोविस जागांवर नावांची उलटापालट केली असल्याचे वृत्त आहे.
रविवारीच होणार होता तिकीट वाटपावर निर्णय
काल झालेल्या बैठकीत भाजपच्या तिकीट वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता होती. पण काही नावांवर दिल्ली भाजपने आक्षेप घेतल्यानंतर आज पुन्हा चर्चेची अंतिम फेरी ठेवण्यात आली. केजरीवाल गटातील आठ बंडखोरांना तिकीट देण्याची यापूर्वी भाजपची योजना होती. पण आता केवळ सहा बंडखोरांना तिकीट दिले जाणार आहे. दोन नावे वगळण्यात आली आहेत. किरण बेदी, शाजिया इल्मी, विनोद कुमार बिन्नी, एमएस धीर आणि अशोक चौहान यांना तिकीट दिले जाणार आहे. इतर तिघांपैकी केवळ फरहाना अंजुम यांना तिकीट मिळणार असल्याचे समजते.
भाजप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्याची काल शेवटची तारीख होती. तरीही यादी जाहीर करण्याला विलंब झाला आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी विलंब करण्यात आला असल्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे.
अमित शहा यांनी कृष्णा तिरथ यांना पुष्पगुच्छ देऊन भाजपमध्ये स्वागत केले, बघा पुढील स्लाईडवर...