आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPA Government Was Misusing CBI Against Ramvilas Paswan

एनडीएच्या वाटेवर असलेल्या पासवानांची सीबीआय चौकशी? सीबीआयचा गैरवापर, भाजपचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बोकारो पोलाद कारखान्यातील भरती घोटाळाप्रकरणी माजी केंद्रीयमंत्री व लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे.
लोकजनशक्ती पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान एनडीएत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वातील एनडीएच्या काळात ते केंद्रीय मंत्री होते. याच काळात झालेल्या घोटाळ्याची चौकशी आता सुरु होणार आहे. दरम्यान त्यांचा एनडीए प्रवेश आणि सीबीआय चौकशी यांच्या अर्थाअर्थी संबंध नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी युपीए सरकार सु़डबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकार सीबीआयचा गैरवापर करत असल्याचे ते म्हणाले.
2008 मध्ये झालेल्या या घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून लवकरच त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक परीक्षार्थींनी याप्रकरणी 12 जनपथ, नवी दिल्ली असा पत्ता दिला आहे. हा पत्ता पासवान यांच्या सरकारी निवासस्थानाचा आहे. अनेक उमेदवारांची भरती व्हावी यासाठी पासवान यांनी शिफारस केल्याचेही स्पष्ट झाले आहे.