आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रमुकच्या पाच मंत्र्यांचे राजीनामे; अविश्वास प्रस्ताव नाही : भाजप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लंकेतील तामिळींच्या मुद्दय़ावर बुधवारी राजधानीत वातावरण तापलेले होते. द्रमुकच्या पाच मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. दरम्यान, सरकार द्रमुकच्या मागण्यांवर पुढे जात असताना अचानक त्यांनी पाठिंबा का काढून घेतला हे कळत नाही, असे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपनेही सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा इरादा नसल्याचे स्पष्ट केले.

द्रमुक मंत्र्यांनी दोन टप्प्यांत राजीनामे सुपूर्द केले. आधी एस.एस. पलनीमाणिक्कम, एस. जगतरक्षकन व एस. गांधी सेल्वन यांनी राजीनामे दिले. त्यानंतर तासाभराने एम.के. अझागिरी व नेपोलियन यांनी दिले. द्रमुकचे प्रमुख करुणानिधी यांचे पुत्र अझागिरी यांनी पंतप्रधानांची वेगळी भेट घेतली. हा त्यांचा बंडखोर पवित्रा मानला जात आहे. द्रमुकचा मित्रपक्ष व्हीसीकेनेही सरकारचा पाठिंबा काढून घेतला. पक्षाचे थिरुमा वलवन थोल एकटे खासदार आहेत.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे त्यांनी पाठिंबा मागे घेत असल्याचे पत्र दिले आहे.