आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPA Pressured Me To Drop Names From CAG Reports, Vinod Rai

कोळसा घोटाळ्यातील नावे वगळण्यासाठी यूपीएचा दबाव - माजी कॅग प्रमुख रॉय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसा घोटाळा आणि राष्ट्रकूल खेळ घोटाळ्यातील काही नावे कॅगच्या अहवालातून वगळण्यात यावी यासाठी यूपीएच्या काही नेत्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा विनोद रॉय यांनी केला आहे. लोकसभेतील दारुण पराभवानंतर अडचणीत आलेली काँग्रेस रविवारी नियंत्रण आणि महालेखापरिक्षक (कॅग) विभागाचे माजी प्रमुख विनोद रॉय यांच्या वक्तव्याने आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
माजी कॅग प्रमुख विनोद रॉय यांचे 'नॉट जस्ट अ‍ॅन अकाऊंट' हे पुस्तक येत्या 15 सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे. त्यात त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, हे पुस्तक एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्यासाठी नाही, तर यंत्रणेतील कमतरता समोर आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.
रॉय यांनी खुलासा केला आहे, की यूपीएचे काही नेते माझ्या घरी आले आणि त्यांनी कोळसा आणि राष्ट्रकूल घोटाळ्यातील काही नेत्यांची नावे कॅगच्या अहवालातून वगळण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र, हे पुस्तक कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून प्रशासनात सुधारणा कशा करता येईल त्यावर प्रकाश टाकेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
पंतप्रधान हे महत्त्वाचे पद आहे. परंतू माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे कठोर निर्णय घेण्याची जबाबदारी स्विकारत नव्हते. या पुस्तकावर आता बोलण्याची मनस्थिती नसल्याचे ते म्हणाले. या पुस्ताकात नेमके काय आहे, यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
यूपीएच्या काळात अनेक मोठे घोटाळे झाले. त्याची किंमत काँगेसला मोजावी लागली आहे. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आता काँग्रेसला आरोपांचा सामना करावा लागत आहे. याआधी माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख, पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारु, आणि एकेकाळी गांधी घराण्याचे निकटवर्तीय असलेले माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंग यांनीही आपल्या पुस्तकात यूपीए सरकारविषयी अनेक गौप्यस्फोट करुन काँग्रेसला अडचणीत आणले होते.