आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upa Would Be Glad If We Had Charged Amit Shah Says Cbi Director

अमित शहांना आरोपी केले असते तर यूपीए सरकार खूष झाले असते, सीबीआय संचालकांचे वादग्रस्त वक्तव्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागचे (सीबीआय) संचालक रंजीत सिन्हा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा यांचे नाव समाविष्ट केले असते तर, यूपीए सरकार जास्त खूष झाले असते. मात्र, नंतर ते त्यांच्या वक्तव्यापासून यू टर्न घेतला आहे. मी तसे म्हटलोच नव्हतो असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. वृत्तवाहिनीने माझे वक्तव्य मोडून तोडून दाखवले असल्याचे ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, तपास यंत्रणेवर कोणताही दबाव नव्हता. सीबीआयचे परिश्रमपूर्वक आरोपपत्र तयार केले आहे.
सिन्हा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, सीबीआयने इशरत जहाँ प्रकरणी योग्य तपास केला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे प्रकरण राजकारणाशी संबंधीत असल्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. मुलाखतीत सिन्हा म्हणाले होते, की आरोपपत्रात अमित शहा यांचे नाव आले असते तर, यूपीए सरकार खूष झाले असते. मुलाखतीत सिन्हा म्हणाले, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली गेली आहे. मात्र, कुठेही अमित शहा यांच्याविरोधात पुरावे मिळाले नाही.