आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - केंद्र सरकार डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या मोहिमेत गुंतले आहे. याचा विचार करता कायदा मंत्री अश्विनीकुमार व रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. बन्सल यांचे नाव रेल्वे लाच घोटाळ्यात आल्याने त्यांचे पद जाणार हे जवळपास निश्चित आहे. प्रश्न फक्त अश्विनीकुमार यांचा आहे. त्यांना हटवले नाही तरी खाते मात्र बदलले जाऊ शकते. कोळसा घोटाळ्यात सीबीआयच्या चौकशी अहवालामध्ये बदल केल्यावरून कुमार यांची बदनामी झाली आहे. यावर गुरुवारी राजधानीत विचारविनिमय आणि बैठका सुरू होत्या.
अटकळ अशीही...
बन्सल, कुमार यांचे राजीनामे : 22 मे रोजी सरकारला 4 वर्षे पूर्ण होत आहेत. तत्पूर्वी, मंत्रिमंडळात फेरबदल करावेत. दोन्ही मंत्र्यांची हकालपट्टी करावी.
बन्सलांचा राजीनामा, कुमारांचा खातेबदल : पवनकुमार बन्सल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा आणि कुमार यांचे खाते बदलावे.
जोशींना रेल्वे, तिवारींना कायदा : काही वृत्तांनुसार सी. पी. जोशी यांना रेल्वे आणि मनीष तिवारी यांना कायदा मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
सीबीआयला सीव्हीसीची नोटीस
सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर सीबीआयला केंद्रीय दक्षता आयोगासमोर (सीव्हीसी) स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. कोळसा घोटाळ्यातील तपासात सरकारी हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त करून सीव्हीसीने यासंबंधी स्पष्टीकरण मागितले आहे.
सीबीआयवर असते सीव्हीसीची नजर
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयवर सीव्हीसीची देखरेख असते. कोळसा घोटाळ्याच्या तपास अहवालात राजकीय नेते तसेच सरकारी अधिकाºयांनी हस्तक्षेप केल्याबद्दल सीव्हीसीने म्हणूनच प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सीबीआयने कोळसा घोटाळ्यात आतापर्यंत 11 गुन्हे दाखल केले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.