आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • UPA's Snoopgate Probe Against Modi To Get Quiet Burial

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SNOOPGATE : मोदींविरोधात चौकशी नाही? आयोगाची स्थापना रेंगाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली : गुजरातमध्ये एका महिलेच्या हेरगिरी प्रकरणी यूपीए सरकारने दिलेला चौकशी आयोग स्थापण्याचा आदेश रेंगाळला आहे. त्यामुळे आता हा आदेश थंड बस्त्यात जाणार असून चौकशी होण्याची शक्यता नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. कॅबिनेटच्या बैठकीत एक नोट सादर करून युपीए सरकारचा आदेश रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. चौकशी आयोग स्थापण्यामागे राजकीय हेतूने प्रेरित निर्णयांचा आढावा घेण्याचे संकेत गृहराज्‍यमंत्री किरन रिज्‍जू यांनी यापूर्वीच दिले आहेत.
युपीए सरकारने 26 डिसेंबर 2013 मध्ये महिलेच्या हेरगिरी प्रकरणी एक न्यायालयीन आयोगाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. विद्यमान पंतप्रधान आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर महिलेच्या हेरगिरी साठी सरकारी यंत्रणांचा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे या मुद्यावरून बरेच राजकारण तापले होते.
एका संकेतस्थळाने या प्रकरणाशी संबंधित असलेला एक व्हिडिओ प्रसारीत केला होता. त्यात मोदींचे नीकटवर्तीय अमित शाह आणि एका पोलिस अधिका-याचे संभाषण होते. या प्रकरणी चौकशी आयोग नेमण्याच्या निर्णयाचा भाजपने तीव्र विरोध केला होता. गुजरात सरकारने आधीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले असताना, आयोग स्थापण्याची गरज नसल्याचे भाजपचे म्हणणे होते.

काय आहे प्रकरण?
कोबरापोस्ट आणि गुलेल या संकेतस्थळांनी 'द स्टॉकर्स' नावाचा एक व्हिडिओ प्रसारीत केला होता. त्यात असलेले रेकॉर्डिंग हे पोलिस अधिकारी गिरीश सिंघल आणि अमित शाह यांची असल्याचा दावाही संकेतस्थळाने केला होता. त्यामुळे गुजरातच्या गृहमंत्र्यांनी महिलेच्या चौकशीचे आदेश दिल्याचा आरोप लावण्यात आला होता. या चर्चेत अमित शाह यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नव्हता. तर 'साहेब' म्हणून कोणाचा तरी उल्लेख करून त्यांचा या प्रकरणात किती रस आहे, हे बोलल्याचे व्हिडीओमध्ये दाखण्यात आले होते.