आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"उफा'नुसारच भारत-पाक चर्चा : भारताची भूमिका काश्मीरशिवाय चर्चा नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रशियातील उफा येथे भारत-पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे ज्या मुद्द्यांवर एकमत झाले त्याच मुद्द्यांवर दोन्ही देशांतील थांबलेली चर्चा पुढे सरकेल, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे. काश्मीर मुद्द्याशिवाय भारताशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही, हे पंतप्रधान नवाझ शरीफ व परराष्ट्रमंत्री सरताज अजीज यांचे वक्तव्य भारताने फेटाळले.
सूत्रांनुसार, अजीज यांनी इस्लामाबादेत केलेले वक्तव्य असो अथवा इतर कोठेही यासंबंधी मांडलेले मुद्दे असोत, भारत याला तसूभरही महत्त्व देणार नाही. चर्चा पुन्हा प्रारंभ व्हावी म्हणून ही प्रक्रिया आता सुरू आहे ती अंतिम निर्णयापर्यंत पोहचण्याआधीच थांबू नये, अशी भारताची भूमिका आहे. दरम्यान, पाकिस्तानने उफातील चर्चेनंतर अचानक भूमिका बदलली असल्याच्या वृत्ताबद्दल केंद्र सरकारने थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. उफामध्ये मोदी-शरीफ यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांतील संबंध सुरळीत व्हावेत, एवढाच मुद्दा आला होता. त्यासाठी नेमकी प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली नाही, असे केंद्राचे म्हणणे आहे.
मोदी-शरीफ यांच्या रशियातील संयुक्त निवेदनाचा प्रमुख आधार
घाईघाईने तयार केले संयुक्त विधान
परराष्ट्र मंत्रालयानुसार, उफामध्ये मोदी-शरीफ यांचे जे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आले ते अत्यंत घाईघाईत तयार करण्यात आले होते. यात दोन्ही नेत्यांत झालेल्या मुद्यांची तर्कसंगत मांडणी नव्हती. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर व पाकिस्तानी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी ते घाईत तयार केले होते. यात कोठेही काश्मीर व हाफिज सईदचा उल्लेख नव्हता. याचा अर्थ हे मुद्दे चर्चेत नव्हते, असा होत नाही असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
पाक काय म्हणतो ते महत्त्वाचे नाही...
संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केले असल्याचे नमूद आहे. याचाच अर्थ पाकने दहशतवाद रोखण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवादासह इतर काही मुद्यांवर आता दोन्ही देशांचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार बैठक घेतील. अर्थातच सीमेवरील घुसखोरी व इतर मुद्दे यात समाविष्ट असतील, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानने भारतीय नेत्यांशी बोलताना जे मुद्दे मांडले तेच महत्त्वाचे आहेत. तेथील नेते लोकांसमोर काय बोलतात हे महत्त्वाचे नाही, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
मोदी-शरीफ भेट महत्त्वाची
वॉशिंग्टन नवाझ शरीफ व नरेंद्र मोदी यांची उफामध्ये झालेल्या भेटीबद्दल अमेरिकेने समाधान व्यक्त केले आहे. दोन्ही देशांनी चर्चेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याने तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ते उपयोगी ठरेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. नेपाळसह इतर शेजारी राष्ट्रांना मदतीचा हात देण्याची नरेंद्र मोदी यांची भूमिका वाखाणण्याजोगी असल्याचेही बायडेन यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...