नवी दिल्ली- दिल्लीच्या उपहार चित्रपटगृहातील अग्निकांडाचे दोषी अंसल बंधू सुशील व गोपाल यांना तुरुंगवासापासून दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना ३०-३० कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देत सांगितले की, त्यांना आता तुरुंगात जावे लागणार नाही.
चित्रपटगृहाला १३ जून १९९७ रोजी आग लागून ५९ जण ठारझाले होते. हायकोर्टाने या प्रकरणी उपहारचे मालक अंसल बंधूना प्रत्येकी एक-एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. दोघांनी साडेचार महिन्यांची शिक्षा भोगली आहे. सुप्रीम कोर्टाने या अवधीला पुरसे ठरवत फक्त दंडाचे आदेश दिले. दंडाची ही रक्कम दिल्ली सरकार जनहितार्थ वापरणार आहे.
धनदांडग्यांनाच सूट : न्याय व्यवस्थेवरील माझा विश्वास डळमळला आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला जेल होणार नाही, असा संदेश निकालातून जातो, असे पीडित संघटनेच्या अध्यक्ष नीलम कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे.