आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षे जुन्या खटल्यात सुप्रीम कोर्टाने CBI ला नाही दिले 15 मिनीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपहार चित्रपटगृहाला आग लागली तेव्हा गदर हा चित्रपट सुरु होता. या दुर्घटनेत 59 जणांचे प्राण गेले. - Divya Marathi
उपहार चित्रपटगृहाला आग लागली तेव्हा गदर हा चित्रपट सुरु होता. या दुर्घटनेत 59 जणांचे प्राण गेले.
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने 18 वर्षे जुन्या उपहार चित्रपटगृहातील अग्निकांडाच्या केसमध्ये गुरुवारी सीबीआयला त्यांची बाजू मांडण्यासाठी 15 मिनीटांचाही वेळ दिला नाही. चित्रपटगृहाला 13 जून 1997 रोजी आग लागून 59 जण ठार झाले होते. बुधवारी या प्रकरणी कोर्टाने अग्निकांडाचे दोषी अंसल बंधू सुशील व गोपाल यांना 30-30 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देत सांगितले की, त्यांना आता तुरुंगात जावे लागणार नाही. गुरुवारी कोर्टा सविस्तर निकाल देणार होते. सुनावणी सुरु झाल्यानंतर सीबीआयने कोर्टाला विनंती केली की आणखी काही बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. सीबीआयने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी 15 मिनीटांचा वेळ मागत अर्ज सादर केला. मात्र, कोर्टाने - आम्ही निर्णय दिला आहे, असे सांगत तो फेटाळला. आता तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल करा असे सांगितले.
सीबीआयने म्हटले, 15 मिनीटांत समाधान झाले नाही, तर कोर्टाने आम्हाला कोर्टाबाहेर काढावे
सीबीआयचे वकील हरीश साळवे म्हणाले, मी 2000 पासून ही केस पाहात आहे. मला आज दुपारी 3.45 ते 4 वाजतापर्यंतचा वेळ द्या. जर त्यानंतरही तुमचे समाधान झाले नाही तर आम्हाला कोर्टाबाहेर काढा.

न्यायाधीश म्हणाले
न्यायाधीश ए.आर.दवे यांच्या नेतृत्वातील बेंच म्हणाले, हे योग्य होणार नाही, आम्ही निर्णय दिला आहे. तीन न्यायाधीशांच्या पीठाने (जस्टिस कुरियन जोसेफ आणि आदर्श कुमार गोयल यांच्यासह ) सांगितले, तुम्हाला ज्या गोष्टी राहून गेल्या असतील असे वाटत आहे, त्यांच्यासह पुनर्विचार याचिका दाखल करा.
पीडित नाराज
पीडितांच्या एका वकीलाने म्हटले, कोर्टाने 15 मिनीटांचा वेळ देण्यास काही हरकत नव्हती. आता तर आम्हाला कोठूनच न्यायाची आशा राहीली नाही.