आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपहार सिनेमा अग्निकांड: अन्सल यांना दिलासा नाही, सोमवारी होणार सुनावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उपहार सिनेमा अग्निकांडामध्ये रिअल इस्टेट व्यापारी गोपाल अन्सल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांची शरणागतीची मुदत वाढवण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर सोमवारी होणाऱ्या सुनावणीला त्यांना हजर राहावे लागेल.
 
९ फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने उपहार कांडावर निर्णय सुनावला होता. अन्सल यांचे मोठे बंंधू सुशील अन्सल यांचे वय पाहता त्यांना तुरुंगवासातून सूट देण्यात आली होती. त्यानंतर धाकटे भाऊ गोपाल अन्सल यांना उर्वरित एक वर्षाची शिक्षा भोगावी, असे आदेश देण्यात आले होते. शरणागतीसाठी त्यांना चार आठवड्यंाचा कालावधी देण्यात आला होता. गोपाल यांनी वकील राम जेठमलानी यांच्या मदतीने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. 
 
शुक्रवारी सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यात पुढील सुनावणी सोमवारी निश्चित करण्यात आली. दुसरीकडे, अन्सल यांची शरण येण्यासाठी मुदत वाढवण्याची विनंती केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली. उपहार सिनेमा अग्निकांडामध्ये ५९ जणांचा मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...