आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uproar In Parliament For Coal Scam, Telangana Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोळसा घोटाळा, तेलंगणाच्या मुद्द्यावर संसदेत गदारोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेमध्ये गुरुवारी कोळसा घोटाळा व तेलंगणाच्या मुद्द्यावर प्रचंड गोंधळ झाला. संसदेत गोंधळाची कोंडी फोडण्यासाठी अखेर सरकारने विरोधकांची मागणी मान्य केली. कोळसा खाणपट्टे वाटपासंदर्भातील फायली गहाळ होण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मनमोहनसिंग शुक्रवारी निवेदन करणार आहेत. स्वतंत्र तेलंगणाचा विरोध करणा-या आंध्र प्रदेशातील 10 खासदारांच्या निलंबनच्या प्रस्तावरही विरोधकांनी गदारोळ केला. यामुळे अन्नसुरक्षा आणि भूसंपादन विधेयकांवर चर्चा होऊ शकली नाही.

पंतप्रधानांनी खाणपट्टे वाटपासंदर्भातील फायली गहाळ होण्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्याव्यतिरिक्त भाकपाचे गुरुदास दासगुप्ता, माकपाचे वासुदेव आचार्य आणि अन्नाद्रमुकचे थंबी दुरई पंतप्रधानांच्या निवेदनासाठी अडून आहेत.

निलंबनाचा प्रस्ताव हाणून पाडला
तेलंगणाच्या मुद्द्यावर कामकाजात सतत अडथळा आणणा-या आंध्र प्रदेशातील दहा खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विरोधकांनी गुरुवारी हाणून पाडला. निलंबनाच्या मुद्द्यावर सरकार व विरोधक आक्रमक झाल्याने गोंधळात भर पडली. संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी कॉँग्रेसचे सात, तर तेदपाच्या तीन खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला होता.