आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uproar In Rajyasabha Over Subramanian Swamy Comment On Sonia Gandhi

रणकंदन: राज्यसभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य, उपाध्यक्षांनी स्वामींना फटकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाच प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ओढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी गुरुवारी पुन्हा काही वादग्रस्त वक्तव्ये केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्तीचे नाव घेऊ नये, अशी समज काल दिल्यानंतरही स्वामींनी आपला पवित्रा कायम ठेवल्यामुळे उपाध्यक्षांनी त्यांना विनाकारण चिथावणीखोर कृती केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.

स्वामी यांनी दुसऱ्या देशाच्या राज्यघटनेचा उल्लेख केल्यावरून काँग्रेस सदस्यांनी विरोध व्यक्त केला. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी प्रसारमाध्यमांनाही संबंधित उल्लेख टाळण्याचे निर्देश दिले. समाजवादी पक्षाचे खासदार चौधरी मुनव्वर यांनी शून्य प्रहरात स्वामी अलिगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा देण्याच्या १९७० च्या चळवळीत सक्रिय होते असा उल्लेख केला. यावर स्वामी यांनी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना आपला विरोध नाही,मात्र घटना त्यांना अर्थपुरवठा करण्यास मनाई करते, असे सांगितले. यावर विरोधी खासदारांनी स्वामी यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर स्वामी यांनी अन्य देशाचे नाव घेतले. त्यावरून काँग्रेसचे सदस्य संतप्त झाले. काही सदस्यांनी हौद्यात उतरण्याचा प्रयत्न केला. कुरियन यांनी अन्य देशाच्या राज्यघटनेचा उल्लेख कामकाजातून वगळत असल्याचे सांगितले. मात्र, यावर समाधान झालेल्या काँग्रेसच्या खासदारांनी स्वामींविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. यावर स्वामी म्हणाले, दुसऱ्या सदस्याकडून माझ्या नावाचा उल्लेख होत असल्यामुळे मला उत्तर देण्याचा हक्क आहे. यानंतर पुन्हा गोंधळ वाढला. यादरम्यान कुरियन म्हणाले, मी तुमच्याविरुद्ध कारवाई करेन. सुब्रमण्यम स्वामी तुम्ही विनाकारण चिथावणी देत आहात. मी तुमच्याविरुद्ध कारवाई करू शकतो. स्वामी काय म्हणाले याची कामकाजात नोंद होणार नाही. काय वगळण्यात आले याचा उल्लेखही प्रसारमाध्यमांनी करू नये.

भाजपची नवी गिफ्ट ही समस्या : आझाद
काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी स्वामींविरोधात कारवाईची मागणी केली. अन्य देशाच्या नावाचा उल्लेख करून ते(स्वामी) टोचण्या आणि चिथावणीही देत आहेत. गांेधळ घालणाऱ्या खासदारांना उपाध्यक्षांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. हा शून्य प्रहराचा तास वाया घालवण्याचा प्रयत्न आहे. वादग्रस्त उल्लेख वगळल्यानंतर समस्या काय आहे,अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, भाजपची नवी "गिफ्ट' ही समस्या आहे. आमच्याबाजूने समस्या नाही. स्वामी सभागृहात येऊन दोनच दिवस झाले आहेत आणि त्यांची वक्तव्ये दोनदा वगळण्यात आली आहेत. वर्षात ३६५ दिवस आहेत. अशात तुम्ही त्यांचे किती शब्द वगळणार आहात,असा सवाल आझाद यांनी उपाध्यक्षांना केला.