आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPSC Aspirants Continue Protest, Demand Scrapping Of CSAT

सी-सॅटची कटकट नकोच; विद्यार्थी-विरोधक अडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील सी-सॅटचा वाद अद्यापही शमलेला नाही. सरकारने सी-सॅट कायम ठेवून इंग्रजीचे 20 गुण गुणवत्ता यादीत गृहीत धरले जाणार नाहीत, असा पर्याय जाहीर केला असला तरी इच्छुक उमेदवार आणि विरोधकांचे त्यामुळे समाधान झालेले नाही. सी-सॅट रद्दच करण्याच्या मागणीवर दोघेही अडून बसले आहेत. त्यामुळे मंगळवारीही संसदेतही या मुद्दय़ावर गदारोळ झाला.

सी-सॅटच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि संयुक्त संसदीय समिती स्थापावी, अशी विरोधकांची मागणी आहे.

..तरच आंदोलन मागे : सी-सॅट आणि 24 ऑगस्टला होणारी पूर्वपरीक्षा रद्द केली तरच आंदोलन मागे घेतले जाईल, अशी भूमिका हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनी घेतली आहे. गेल्या 26 दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे.