आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससी' सीसॅटमध्ये पात्रतेसाठी ३३% गुण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पुणे- एका मोठ्या घटकाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत केंद्र सरकारने केेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा प्रारंभिक परीक्षेतील वादग्रस्त स्वाभाविक कल चाचणी (अॅप्टिट्यूड टेस्ट) आणि पात्रतेसाठी ३३ टक्के गुणांची अट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी या चाचणीबाबत तज्ज्ञांची समिती स्थापण्याचीही घोषणा केली आहे.

समितीच्या शिफारशींवर केंद्र सरकार कोणताही निर्णय घेईपर्यंत प्रारंभिक परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर क्रमांक२ (नागरी सेवा स्वाभाविक कल चाचणी म्हणजेच सीसॅट) हा पात्रतेचा विषय आणि त्या पात्रतेसाठी त्या विषयात किमान ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.

या निर्णयामुळे २०१५ ची नागरी सेवा परीक्षा २०१४ मध्ये निश्चित पॅटर्नप्रमाणेच होईल. दुसऱ्या पेपरमध्ये स्वाभाविक कल चाचणीचे प्रश्न असतील. इंग्रजी विभागाचे प्रश्न श्रेणीकरणात धरले जाणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.