आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UPSC Exam Results Marksheets Put Online; Civil Services Topper Scored 53 Percent

फक्त ५३ टक्के गुणांवर यूपीएससीमध्ये इरा टॉपर, गुणपत्रक ऑनलाइन उपलब्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(यूपीएससी) परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इरा सिंघलला ५३ टक्के गुण मिळाले आहेत. त्यावरून देशातील सर्वोच्च सनदी अधिकारी निवडणाऱ्या यूपीएससीच्या या परीक्षेचा पॅटर्न किती कठीण असेल, याची कल्पना यावी. निवड झालेल्या आणि अपात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक ऑनलाइन उपलब्ध करण्यात आले असून, त्यातून हे आकडे समोर आले आहेत.
सनदी सेवा परीक्षा दरवर्षी प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत तीन टप्प्यांत होते. भारतीय महसूल सेवेच्या (कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइज) अधिकारी इरा सिंघल २०१४ च्या परीक्षेत ‘टॉपर’ ठरल्या आहेत. त्यांनी एकूण २,०२५ गुणांपैकी (१७५० गुण मुख्य परीक्षेचे २७५ गुण मुलाखतीचे) १,०८२ गुण (५३.४३ टक्के) मिळवले आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या केरळच्या डॉ. रेणू राज यांनी १,०५६ गुण (५२.१४ टक्के), तिसऱ्या स्थानी असलेल्या निधी गुप्तांनी १,०२५ गुण (५०.६१ टक्के) मिळवले आहेत.
बातम्या आणखी आहेत...