नवी दिल्ली - यूपीएससी परीक्षेच्या बदललेल्या स्वरूपावरून आंदोलन पेटलेले असताना केंद्र सरकार मात्र भूमिकेवर ठाम आहे. पूर्व परीक्षा 24 ऑगस्टलाच होईल, शिवाय सी-सॅट पेपरही रद्द होऊ शकणार नाही. फक्त इंग्रजीचे 20 गुण गुणवत्ता यादीत गृहीत न धरण्याचा निर्णय लागू राहील.
संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी लोकसभेत सांगितले, पूर्व परीक्षा रद्द करणे सद्य:स्थितीत शक्य नाही. संसद अधिवेशनानंतर सर्व पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सध्या विद्यार्थी या परीक्षेची कसून तयारी करत आहेत. अशा काळात काही बदल केले तर योग्य ठरणार नाही. शिवाय, परीक्षेपूर्वी 10-15 दिवसांत असे बदल शक्य नाहीत.