आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससीत भाषांतराच्या नावाने अजूनही बोंबच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / जयपूर/ पाटणा/ भोपाळ- यूपीएससीची पूर्वपरीक्षा रविवारी पार पडली. मात्र प्रश्नपत्रिकेत इंग्रजी-हिंदी भाषांतर अत्यंत अगम्य असल्याने परीक्षार्थी चांगलेच गोंधळून गेले. सामान्यज्ञानाच्या भागातील प्रश्नांचा हिंदी अनुवाद अत्यंत क्लिष्ट असल्याने अनेकांना उत्तरे सोडवता आली नाही. इंग्रजीचे प्रश्न "गुगल ट्रान्स्लेट'द्वारे हिंदीत भाषांतरित करण्यात आले होते. त्यामुळे ते समजलेच नाही. ज्या मुद्द्यावर आंदोलन केले पुन्हा त्याच समस्येशी झुंजावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी 'दिव्य मराठी’कडे नोंदवली. या वेळी गेल्या वर्षीपेक्षा १.२७ लाख जास्त म्हणजे ४.५१ लाख विद्यार्थ्यानी पूर्वपरीक्षा दिली आहे.
काही प्रश्नांतील हिंदीचे शब्द असे होते

>इंग्रजी हिंदी भाषांतर
>डेटा दत्त
>प्लातस्टिक सुघट्य
>बोल्डर्स विशाल गोलाश्म
>अर्थ अवर पृथ्वीकाल
>१० डिग्री दस अंश चॅनेल जलमार्ग