आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPSC News In Marathi, Divya Marathi, Supreme Court

यूपीएससीची पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोमवारी होत असलेली यूपीएससीची पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने रविवारी फेटाळली. उमेदवारांचा आक्षेप असलेल्या आकलनाच्या मुद्द्यावर आयोगाने तोडगा काढला असल्याने शेवटच्या क्षणी ही परीक्षा थांबवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती जे. एस. खेहार आणि न्या. अरुण मिश्रा यांच्या पीठासमोर रविवारी सुटीच्या दिवशी अग्नेश कुमार यांनी दाखल केलेल्या यािचकेवर ही विशेष सुनावणी घेण्यात आली. यूपीएससी परीक्षेचे सध्याचे स्वरूप हिंदीभािषक विद्यार्थ्यांना आकलन होण्याच्या दृष्टीने कठीण असल्याचा युिक्तवाद यािचकांत करण्यात आला होता. यावर न्यायालयाने आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा दाखला दिला. आकलनासंबधीच्या प्रश्नांचे गुण गुणवत्ता यादीत ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता हा प्रश्नच मार्गी लागला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.