नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 2013 मधील नागरी सेवा परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. महाराष्ट्रातून विपिन विठोबा इटणकर याने अव्वल तर देशपातळीवर 14 वे स्थान पटकावले. गौरव अग्रवाल देशातून पहिला आला. परीक्षेत 80 हून अधिक मराठी उमेदवारांनी यश संपादन केले. यंदा या परीक्षेत 1122 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुनीश शर्माने द्वितीय, सचित राज याने तिसरे स्थान पटकावले. टॉप टेनमध्ये 3 मुली आहेत. उत्तीर्णांची भारतीय प्रशासन सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस व केंद्रीय सेवा गट अ व ब यात नियुक्तीची शिफारस लोकसेवा आयोगाने केली आहे.
गेवराईचा डॉ. विजय राठोड 84 व्या क्रमांकावर
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गेवराई येथील डॉ. विजय चंद्रकांत राठोड या युवकाने 84 वा क्रमांक मिळवला.
0 पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या विजयने तीन वर्षांपासून या परीक्षेसाठी प्रयत्न केले होते.
0 प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या विजयने दुसर्या प्रयत्नात हे यश संपादन केले.
0 डॉ. विजय यांचे वडील पोलिस खात्यात आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्याने आयएएस होण्यासाठी प्रयत्न केले होते.
यूपीएससीवर मराठी झेंडा
एकूण उत्तीर्णांची संख्या
517 सर्वसाधारण
326 इतर मागास प्रवर्ग
187 अनुसूचित जाती
92 अनुसूचित जमाती
80 मराठी विद्यार्थी यशस्वी
नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आज जाहीर झाला. देशातील 1 हजार 122 उमेदवार यात यशस्वी ठरले. त्यात 80 हून अधिक मराठी उमदेवारांनी यश संपादन केले आहे.
केंद्र शासनाने विविध सेवांमधील 1228 रिक्त जागा असल्याचे आयोगास कळवले होते. आज जाहीर झालेल्या निकालात केंद्रीय लोकसेवा आयोगाने 1 हजार 122 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. एकूण यशस्वी उमेदवारांपैकी 30 उमेदवार शारीरिक विकलांग आहेत. लोकसेवा आयोगाने 210 उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे, तर भारतीय पोलिस सेवेत 150 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. केंद्रीय सेवा गट क या सेवेमध्ये एकूण 710 जागा रिक्त आहेत.
महाराष्ट्रातील उत्तीर्ण व त्यांचा यादीतील क्रमांक : विपिन इटणकर (14), शीतल पटले (22), प्रभव जोशी (23), प्राजक्ता ठाकूर (132), अबोली नरवणे (163), निखिल सारस्वत (281), अमोल येडगे (254), प्रियंका माशेलकर (300), निखिल फुंडे (302), अक्षय तापडिया (303) सागर डोईफोडे (310), प्रसाद वरवंटीकर (316), देवांगी स्वर्णकर (322), निखिल पिंगळे (353), अभिजित शेवाळे (354), अभिषेक महाजन (366), हर्षल मेटे (386), सात्त्विक देव (373), माधव सुळफुले (387), धनाजी कदम (381), समीर अकोलकर (403), विपुल देव (411), मयूर पाटील (554), संजय खरात (535), अमित माने (616), भूषण पाटील (617), अभिजित गुरव (672), महेश चव्हाण (679), स्नेहल कारले (717), अनंत तांबे (728), चेतन कळमकर (731), स्वच्छंद चव्हाण (750), ऋषिकेश सोनावणे (760), अमित खटावकर (765), सोनाली सोनकवडे (774), अंकित धाकरे (800), विवेक भस्मे (812), रोहित निगवेकर (826), सुशील शेंडगे (827), कविता पाटील (890), अक्षय शिंदे (905), मोनिका पंगते (979), धीरज सोनकांबळे (082), कपिल जोशी (1006), विजया जाधव (1076). यामध्ये ओपनमधून 369, ओबीसीतून 188, एससी 103 एसटी प्रवर्गातून 50 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
केंद्रीय सेवा गट ख - या सेवेमध्ये एकूण - 156 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून (ओपन) - 71 उमेदवार, इतर मागास प्रवगार्तून - 37, अनुसूचित जाती प्रवगार्तून - 30, तर अनुसूचित जमाती प्रवगार्तून 18 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.