आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPSC Result Announced On: Gaurav Agarwal To The Top

UPSC त मराठी टक्का वाढला, प्रशिक्षणार्थी IPS गौरव अग्रवाल देशात अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी)2013 मध्ये घेण्यात आलेल्या (मुख्य) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. गौरव अग्रवाल याने देशात अव्वल क्रमांक पटाकवला आहे. दुस-या आणि तिस-या स्थानावर अनुक्रमे मुनीष शर्मा आणि रचित शर्मा आहेत. पहिल्या दहात तीन विद्यार्थीनींचाही समावेश आहे. सर्वाधिक गुण मिळविणारा गौरव अग्रवाल याची आयपीएस साठी निवड करण्यात आली आहे. सध्या तो आयपीएसचे प्रशिक्षण घेत आहे.
यूपीसीने डिसेंबर 2013 मध्ये लेखी परीक्षा आणि एप्रिल-जून 2014 मध्ये मुलाखती घेतल्या होत्या त्यात 1122 उमेदवारांची निवड केली आहे. यात वर्गवारीनुसार खुल्या वर्गाती 517, ओबीसी 326, अनुसूचित जाती 187, अनुसूचित जमातीतून 92 उमेदवारांची निवड झाली आहे. ही परीक्षा 1228 जागांसाठी घेण्यात आली होती.
निवड झालेल्या 1122 उमेदवारांना भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), केंद्रीय सेवा आणि ग्रुप ए व बी मध्ये नियुक्ती देण्यात येईल.
हे आहेत टॉप टेन उमेदवार
क्रमांक आसन क्रमांक नाव
1- 249085 गौरव अग्रवाल
2- 016290 मुनीष शर्मा
3- 100841 रचित राज
4- 565614 अक्षय त्रिपाठी
5- 026831 भारती दीक्षित
6- 200409 साक्षी सवाहने
7- 007844 चंचल राना
8- 002320 जॉनी टॉम वर्गिस
9- 355620 दिव्यांशु झा
10- 003713 मेधा रूपम

संपूर्ण निकाल पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील 56 विद्यार्थी युपीएससीत यशस्वी

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. देशातील सर्वात आव्हानात्मक आणि अवघड अशा या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन या विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशाला, राज्याला
चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे आणि हे विद्यार्थी नागरी सेवेमध्ये ज्या ठिकाणी नियुक्त होतील त्या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा निश्चितपणे उमटवतील असा मला विश्वास वाटतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील यशस्वी
शशांक शुभनकर 60वा,
प्राजक्ता ठाकूर 132वी,
अमोल येडगे 254वा,
प्रियांका माशेलकर 300वी,
निखिल फुंडे 302वा,
स्वप्निल टेंबे 337वा,
निखिल पिंगळे 353वा,
अभिजित शेवळे 354वा,
पुष्कराज भांगे पाटील 357वा,
अभिषेक महाजन 366वा,
सात्विक देव 373वा,
भाग्यश्री नवटाके 376वी,
धनाजी कदम 381वा,
हर्षल मेटे 386वा,
मयुर पाटील 514वा,
जय पाटील 546वा,
संजय खरात 535वा,
अमितकुमार माने 616वा,
भूषण पाटील 617वा,
व्यंकटेश धोत्रे 653वा,
अभिजीत गुरव 672वा,
महेश चव्हाण 679वा,
संदीप साठे 706वा,
ऋषिकश सोनावणे 760वा,
अमितकुमार खटावकर 765वा,
सोनल सोनकवडे 774वी,
रोहीत जोशी 788वा,
अंकिता धाक्रे 800वी,
मृण्यय रामटेके 811वा,
विवेक भस्मे 812वा,
प्रवीण चव्हाण 815वा,
अभय शेंडे 821वा,
रोहीत निगवेकर 826वा,
सुशील शेंडगे 827वा,
प्रज्ञा घोलप 830वी,
सुनील भोकरे 884वा,
कविता पाटील 890वी,
वसुंधरा गुल्हाणे 892वी,
अक्षय शिंदे 905वा,
दिलीराज दाभोळे 920वा,
अर्पित गुदाधे 922वा,
ऋषिकेश खिलारे 951वा,
मोनिका पांगते 969वी,
जय वाघमारे 973वा
गणेश पोटे 975वा
योगेश भरसाट 989वा
पलश भोयर 998वा
आदिनाथ दगडे 1000वा
व्यंकटेश जाधव 1005वा,
विवेक होके 1023वा
हेमंत पोळ 1039वा
विजया जाधव 1069वी,
मनिष राऊत 1078वा,
राजेश गवळी 1118वा
अंबरनाथ खुले 1119वा
आणि बाळू नागवे 1122वा.