आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीएससी पूर्वपरीक्षेचे निकाल जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेतल्या जाणार्‍या यंदाच्या सनदी सेवेच्या पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सुमारे 16 हजार उमेदवार यात यशस्वीरीत्या पात्र ठरले आहेत.

26 मे रोजी झालेल्या पूर्वपरीक्षेतील पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी आयोगाच्या www.upsc.gov.in वेबसाइटवर अर्ज करून विस्तृत अर्ज नमुना (डीएएफ) दाखल करण्यास सांगितले गेले आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्या प्रिंट आऊटवर स्वाक्षरी करून इतर विहित कागदपत्रे व शुल्कासह आयोगाकडे पाठवावी लागणार आहेत.