आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीएससी टॉपर्स एकमेकांच्या प्रेमात, देशात पहिली आलेली टीना अडकणार विवाहबंधनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ही प्रेमकथा एखाद्या कथा-कादंबरीला शोभावी अशी आहे. बॉलिवूडच्या मसाला चित्रपटांसाठी तर पूरकच आहे. या कथेची नायिका आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील टॉपर टीना डाबी आणि नायक आहे याच परीक्षेत दुसरी रँक मिळविणारा अतहर आमिर खान. या दोघांची पहिली भेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभात झाली आणि लव्ह अॅट फर्स्ट साइट म्हणतात ते अतहर आमिर खानला झाले. पहिल्याच भेटीत तो टीनाच्या प्रेमात पडला. हे सर्व स्वतः टीनाने तिच्या फेसबुक अकाऊंटवरील पोस्टमध्ये सांगितले आहे. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे. लग्नाची तारीख अजून निश्चित झालेली नाही. टीना 2015 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत देशातून प्रथम आली होती. एखाद्या मागासवर्गीय विद्यार्थीने प्रथमच एवढे मोठे यश मिळविले आहे. तर अतहर खान अल्पसंख्याक समाजातील असून जम्मू-काश्मीरमधील आहे.
फेसबुकवर शुभेच्छांचा वर्षाव...
9 नोव्हेंबरला टीनाने या रिलेशनशिपबद्दल फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यासोबतच काही फोटोज् शेअर केले.
- फेसबुकवर आमिरसोबतचा फोटो पोस्ट करुन टीनाने लिहिले, 'इन अ रिलेशनशिप विथ अतहर आमिर खान'. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.
- 16 नोव्हेंबरला टीनाने आमिरसोबतच्या नेदरलँड व्हिजिटचे फोटो शेअर केले.
- दोघे सध्या मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत.
पहिल्या भेटीबद्दल टीनाने काय सांगितले...
- काश्मीरमधील छोट्याशा गावातील आमिरने आणि मागास समाजातील अवघ्या 22 वर्षांच्या टिनाने यूपीएससी परीक्षेत मिळविलेले यश दैदिप्यमान होते. त्याबद्दल देशभरातून त्यांचे कौतूक झाले.
- त्यांची पहिले भेट 11 मे रोजी नॉर्थ ब्लॉक येथे झाली.
- याबद्दल टीना सांगते, आम्ही सकाळी भेटलो आणि संध्याकाळी आमिर माझ्या दारात उभा होता. पहिल्या भेटीतच तो माझ्या प्रेमात पडला होता. ऑगस्ट येता-येता माझ्यावरही आमिरची जादू झाली होती. व्यक्ती म्हणून तो फारच चांगला आहे.
निगेटिव्ह कॉमेंट्सचा मनस्ताप
- आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि आनंदी आहोत. मात्र फेसबुकवर आमच्या विरोधातील कॉमेंट्स वाचायला मिळतात त्याने मनस्ताप होतो. पण, सार्वजनिक जीवनात राहाण्याची तेवढी किंमत तर मोजावीच लागेल.
- त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवर टीना म्हणाली, मी एक स्वतंत्र विचाराची महिला आहे. माझी आवड-निवड काय असावी हे ठरविण्याचा मला अधिकार आहे. आमच्या दोघांसोबत आमचे कुटुंबीय देखिल आनंदी आहेत.
- आम्हाला सपोर्ट करणारेही कमी नाहीत. माझी फेसबुक टाइमलाइन पाहिली तर तुमच्या लक्षात येईल मला शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या किती आहे. लोकांच्या सपोर्ट आणि सदिच्छांमुळे मी आनंदी आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, टीना - अतहर आमिर खान यांचे निवडक फोटोज्...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...