आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#UriAttack: 4 दहशतवाद्यांची 105 मिनिटे रेकी, 3 मिनिटांत फेकले 17 ग्रेनेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चार पाकिस्तानी अतिरेक्यांनी रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या एका छावणीवर केलेल्या भीषण हल्ल्यात 20 जवान शहीद झाले. शहीद जवानांमध्ये महाराष्‍ट्रातील तीन सुपूत्र आहेत. उपचारादरम्यान तिघांची प्राणज्योत मालवली.

14 जवानांचा होरपळून मृत्यू...
हल्ला झाला त्यावेळी बराकीत झोपलेल्या 14 जवानांचा जळून मृत्यू झाला, तर 20 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या वेळी भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत चारही अतिरेकी मारले गेले. नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसलेल्या दहशतवादी सलामाबाद नाला भागातून भारतात आले होते. लष्करी छावणीपासून हा नाला सहा किलोमीटर अंंतरावर आहे.
105 मिनिटांच्या रेकी नंतर केला हल्ला...
3.30 पहाटे: उरीच्या दहाव्या इन्फ्रंटी ब्रिगेड मुख्यालयाच्या मागील भिंतीजवळील नालामार्गे चार दहशतवादी कॅम्पमध्ये घुुसले.
5.15 वाजता: इंधनाच्या टाकीतून डिझेल भरत असलेल्या जवानांवर हल्ला. त्यामुळे 150 मीटर परिसरातील तंबू बराकीत अग्नितांडव.
5.19 वाजता: लष्कराकडून प्रत्युत्तर. एका अतिरेक्याचा जागीच खात्मा. तीन अतिरेकी रिकाम्या बराकीत शिरले.
7.12 वाजता: निमलष्करी दलाला पाचारण. हेलिकाॅप्टरच्या साह्याने ते घटनास्थळी पाेहाेचले.
7.45 वाजता: जवानांनी लपलेल्या तीन अतिरेक्यांना गाेळ्या घातल्या.
8.30 वाजता: माेहीम फत्ते
तीन म‍िनिटांंत फेकले 17 ग्रेनेड
एका जवानाने दिलेली माहिती अशी की, दहशतवादी 3.30 वाजता कॅम्पच्या मागील भींंतीवरून आत घुसले. साधारण पावणे दोन तास त्यांनी नाइट व्हिजनमध्ये कॅॅम्पची माहिती घेतली. पहाटे 5.15 वाजता फ्यूल टँकमधून (इंंधन भांंडार) डिझेल भरणार्‍या जवानांंवर हल्ला केला. 3 मिनिटांंत 17 ग्रेनेड फेकले.

बराकीत लावली आग...
- सूत्रांंकडून मिळालेली माहिती अशी की, दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी 150 मीटर परिसरात पसरलेल्या बरकीत आग लावली.
- डिझेेल टॅंकचा स्फोट होताच चारही दहशतवादी वेगवेगळ्या बराकीत घुसले आणि अंंदाधुंंद गोळीबार केला.
- 19 वर्षाच्या एका डोगरा जवानाने एका दहशतवाद्याला ठार मारले. उर्वरित तीन दहशतवादी देखील जखमी झाले होते.
- बराकी रिकामे झाले होते. दहशतवादी दुसर्‍या मजल्यावर पोहोचले होते. नंतर हेलीकॉप्टरने पोहोचलेल्या चार पॅरा कमांडोजनी तीनही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

युद्धाच्या तयारीत आले होते दहशतवादी...
- डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन ले. जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले की, दहशतवादी युद्धाच्या तयारीत आले होते.
- त्यांच्याकडे चार एके-47, चार अंडर बॅरेल ग्रेनेड लॉन्चर आणि मोठा दारुगोळा सापडला आहे.
- त्यांच्याकडे आग लावण्याचे शस्त्र देखील होते.
- नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसलेल्या दहशतवादी सलामाबाद नाला भागातून भारतात आले होते. लष्करी छावणीपासून हा नाला सहा किलोमीटर अंंतरावर आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, पठाणकोट ते उरी; यावर्षी हल्ले, 100 हून अिधक घुसखोरी....गुप्तचर संस्थांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे भोवले....
बातम्या आणखी आहेत...