आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षी शिजला होता उरी हल्ल्याचा कट; ISIच्या नेतृत्त्वात बनली हल्ल्याची ब्लूप्रिंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- समोरून लढण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती म्हणूनच त्यांनी हा भ्याड हल्ला केला. लष्कराची वर्दी परिधान करून रात्रीच्या काळोखाचा त्यांनी फायदा घेतला. नदी ओलांडून मागच्या बाजूने तारा कापून छावणीत प्रवेश केला.

काही जवान ड्युटी बदलण्याची तयारी करत होते तर काही ड्युटी करून बराकीत विश्रांती घेत होते. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड फेकले. जवानांंचा आगीत होरपळून मृत्यू झाला. जास्तीत जास्त जवानांना मारणे, हेच त्यांचे टार्गेट होते. आणि झाले तसेच. आपले 18 जवान या हल्ल्यात शहीद झाले. नंतर पॅरा कमांंडोजनी मोर्चा हातात घेऊन एक-एक करून चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारले गेलेले दहशतवादी 'अफजल गुरु ब्रिगेड'चे असल्याची माहिती समोर आली आहे.

काश्मीरमध्ये काही दहशतवाद्यांनी एकत्र येऊन 'अफजल गुरु स्क्वॉड' स्थापन केला आहे. दरम्यान, जैश-ए-मोहम्मद या संंघटनेचीच ती एक तुकडी आहे. पाकच्या मदतीने भारतात घातपात घडवणे, जास्तीत जास्त हानी करणे, हा तिचा उद्देश आहे.

अखेर कोण होते ते चौघे? ते कोणत्या उद्देशाने आले होते? ते खरंच पाकिस्तानी होते काय? असे एक ना अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. या अनेक प्रश्नांचे सध्या तरी एकच उत्तर दिसत आहे, ते म्हणजे मसूद अझहर.

पुढील स्लाइडवर वाचा, मसूद अझहर हा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड...
बातम्या आणखी आहेत...