आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उर्जित पटेल असतील RBI चे नवे गव्‍हर्नर, 3 वर्षांचा राहील कार्यकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून ऊर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे . विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ 5 सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बँकेचे उपगव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नावाची गव्‍हर्नरपदासाठी घोषणा करण्यात आली आहे. ही चार नावे होती चर्चेत..
- गव्‍हर्नर पदासाठी सरकारने निश्चित केलेल्या चार जणांची नावे चर्चेत होती.
- ऊर्जित पटेल, माजी उप गव्हर्नर राकेश मोहन, सुबीर गोकर्ण आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांचा या चार नावांमध्‍ये समावेश होता.
- अखेर ऊर्जित यांची रघुराम राजन यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वित्त मंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासोबत चर्चा केली त्‍यानंतर उर्जित यांचे नाव जाहीर करण्‍यात आले. पटेल हे राजन यांचे सर्वात जवळचे आहेत. रघुराम राजन यांच्‍या आधीपासून पटेल आरबीआयमध्‍ये होते.
बातम्या आणखी आहेत...